सौंदाळा जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा प्रभात फेरीतून गुंजले देशभक्तीचे घोष

सौंदाळा जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा प्रभात फेरीतून  गुंजले देशभक्तीचे घोष

सौंदाळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा; प्रभात फेरीतून गुंजले देशभक्तीचे घोष

 

सौंदाळा ( नेवासा प्रतिनिधी युनूस पठाण ) – १५ ऑगस्ट २०२५:

सौंदाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७९वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून गावातील मुख्य रस्त्यांवर “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “जय हिंद” अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमवला.

 

गावाचे सरपंच श्री. शरद आरगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत एकसुरात गाऊन वातावरण देशभक्तीमय केले.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, कविता व नाटक सादर करून स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याची आठवण करून दिली. मुलांनी तिरंगा फडकवत देशभक्तीचे घोषवाक्ये दिली. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ऐक्य, त्याग आणि प्रामाणिकपणाचा संदेश देण्यात आला.

 

शाळेतील प्रा. घुले सर व शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेला त्याग आणि आजच्या पिढीची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. पालक आणि ग्रामस्थांनीही कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रयत्न केले. आभार प्रकट करून कार्यक्रमाची सांगता झाली.

 

कार्यक्रमास कृषिदूत भावेश बागुल, रितेश मराठे, स्नेहांशू मोहिते, प्रशांत लगड, अभिजित कदम आणि साहिल कुंभारे उपस्थित होते. कृषिदूतांनी प्रभात फेरीच्या आयोजनात, विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनात आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात मोलाचे सहकार्य केले.