श्रीरामपूर रेल्वे पोलिसानी केलेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेचे अपहरण, घातपात..?

श्रीरामपूर रेल्वे पोलिसानी केलेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेचे अपहरण, घातपात..?
प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
सविस्तर_श्रीरामपूर येथे दिनांक :- १९/०३/२०२५ रोजी एका पिडीत महिलेने, श्रीरामपूर येथील एका रेल्वे पोलिसाकडून नौकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती, त्यामूळे एकच खळबळ उडाली होती, त्यानंतर सदरील पिडीत महीलेशी सम्पर्क होत नसल्याने संबधीत महिलेचे अपहरण किव्वा घातपात झाल्याचा तक्रार अर्ज, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर यांना देण्यात आला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर यांना दिलेल्या तक्रार म्हटले आहे की, दि. १८/०३/२०२५ रोजी दाखल झालेल्या फिर्यादी मधील पिडीता हिने मला फोनव्दारे संपर्क करून मला त्वरीत भेटण्याची विनंती केली. सदर दिवशी मी छ.संभाजीनगर येथील हायकोर्टात असल्याकारणाने, मी आल्यावर भेटते असे सांगितले. व सदर पिडीतेस विचारले की, काय झाले. त्यावर सदर पिडीतेने मला सांगितले की, माझ्यावर खुप मोठा अन्याय झाला असुन तुम्ही मला लवकर भेटा. त्यानंतर मी पिडीतेस भेटले असता, पिडीतेने मला सांगितले की, एका *** आढाव नाम व्यक्तीने माझ्याशी बळजबरी करून माझा बलात्कार केला आहे. त्यावर मी पिडीतेचे सांत्वन करून तिला धीर दिला. सदर पिडीता ही खुप रडत असल्याने व ती माझ्याच समाजाची असल्याने मला तिची दया आली म्हणुन मी योग्य तो सल्ला घेतल्याने मला असे समजले की, सदर प्रकरणी लवकरात लवकर फिर्याद दाखल करणे व पिडीतेचे मेडीकल करणे गरजेचे आहे. त्या सल्याप्रमाणे मी सदर पिडीतेस श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे जाण्यास सांगितले व मी पाठीमागुन येते, असा तिला धीर दिला व त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे सदर गुन्हा दाखल करुन पिडीतेचे मेडीकल देखील करून घेतले व पिडीतेला तिच्या घरी नेवुन सोडले. त्यानंतर पिडीता दि. १९/०३/२०२५ रोजी माझेशी संपर्क झाला असता, तिने मला सांगितले की, मी पंचनामा करण्यास चाललेले आहे. त्यानंतर दि.२०/०३/२०२५ पासुन सदर पिडीता हिच्याशी माझा संपर्क होत नाही, तसेच तिच्या पतीशी देखील माझा संपर्क होत नाही. सदर पिडीतेच्या घरी जावुन चौकशी केली असता, सदर पिडीता ही घरी आढळून आलेली नाही. व तिच्या मुली या घाबरलेल्या अवस्थेत दिसल्या, त्यामुळे मला अशी पुर्ण शंका आहे की, पिडीतेसोबत काहीतरी अघटीत घडल्याचा संशय आहे. कारण सदर प्रकरणातील आरोपी हा रेल्वे पोलीस कर्मचारी असल्याने त्याचा मोठा जोडजमाव व ओळख आहे. तसेच त्याला वाचविण्यासाठी सध्या विविध राजकीय क्षेत्रातील लोक व विविध संघटना कार्यरत होवुन त्यास वाचविण्यास पुरेपुर प्रयत्न करीत आहे. मला देखील भरपुर राजकीय क्षेत्रातील व गुंड प्रवृत्तीचे लोक तसेच काही पत्रकार व श्रीरामपूर येथील काही नावाजलेले वकील लोकांचा फोन येत आहे. तसेच मॅसेज येत आहे. व ते मला आरोपीच्या बाजुने जबाब द्यायला दबाव आणत आहे. मी देखील प्रचंड भिती व दबावाखाली जगत आहे. हे लोक माझा देखील घातपात करतील, अशी मला शंका आहे. तरी सदर पिडीता हिच्यासोबत घातपात होवुन हिचे काही बरेवाईट झाले आहे का, याचा लवकरात लवकर तपास करून पिडीतेचा शोध घ्यावा, ही नम्र विनंती.
दिनांक : २४/०३/२०२५. रोजी वरील प्रमाणे सर्व हकीगत अर्जदार महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केली आहे, आता सदरील प्रकरण काय वळण घेते याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले असून, संबधीत प्रकरणांत काय सत्यता आहे हे पोलिस तपासात निष्पन्न होईल.