पद्मश्री पोपटराव पवार यांची बालाजी देडगाव येथे श्री .क्षेत्र बालाजी देवस्थानला भेट.
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण) नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सुरू असलेल्या महापावन गणपती देवस्थान परिसरात बालाजी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने महाश्रमदान आयोजित सप्ताह निमित्त पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते एकशे एक झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातील नामांकित असलेले देडगावचे बालाजी मंदिर प्रसिद्ध असल्याने यावेळी पद्मश्री पोपटराव पवार यांनी बालाजी मंदिराच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करत मंदिरास भेट दिली. व मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करण्यात आली .
या भेटीनिमित्त पद्मश्री पोपटराव पवार यांचा बालाजी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला. व देवस्थान विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली .तसेच पद्मश्री पोपटराव यांनी या देवस्थानच्या विकासाबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. मंदिराचा परिसर पाहून या तीर्थक्षेत्राचे कौतुक केले.
यावेळी शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे ,सुभेदार राजु ठाणगे, संदिप गुंजाळ,माजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब शेळके,देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वस्त रामभाऊ कुटे, सुनील काका मुथा, सुभाष मुंगसे, विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके, गोखले इन्स्टिट्यूट चे वैज्ञानिक दिपकराव काजळे ,संभाजीराव काजळे ,गणेश औटी, अशोक पाटील मुंगसे ,ग्रामपंचायत नूतन सदस्य लालबहादुर कोकरे ,महादेव पुंड, अभिजीत ससाणे, मेजर शिवाजीराव पठाडे , आदिनाथ मुंगसे ,जय हरी संजय मुंगसे, झाकीर पठाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.