कॉलेजच्या नावाखाली गुटूरगुम चालायचे ... पडद्यामागे कॉलेज मधील प्रेमीयुगलांनी कॅन्टीन फुलायचे.... !!

कॉलेजच्या नावाखाली गुटूरगुम  चालायचे ... पडद्यामागे कॉलेज मधील प्रेमीयुगलांनी कॅन्टीन फुलायचे.... !!

सोनई :: --
   घटनेची हकीगत अशी की,  सोन‌ई येथील राहुरी रोड लगत काॅलेजला खेटून बरचशा कॅन्टीन आहेत मात्र त्यातील दोन कॅन्टीन द ब्राऊन मग कॅफे व बीट अँड लाइन्स कॅफे च्या कंपार्टमेंट मध्ये  भलतेच चालू असायचे. काही कॉलेजला येणाऱ्या तरुण-तरुणींना एकांतात बसण्यासाठी कॅफे कॅन्टीन वाल्यांनी कंपार्टमेंट तयार करून पडदे लावून कॉलेजच्या तरुण-तरुणींना गैरकृत्य करण्या करिता जागा तयार करून दिल्याचे उघड झाले आहे, 
या कंपार्टमेंट मधील आडोशाचा फायदा घेऊन कॉलेजच्या नावाखाली भर दिवसा वेगळाच खेळ चालू असायचा.पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आल्या बरोबर पोलिसांनी ताबडतोब सदर कॅफे कँटीन वर कारवाई करून पडदे काढून टाकण्यास सांगितले व असे काही गैरकृत्य करताना कपल आढळल्यास त्यांच्याविरुद्ध व कॅफे कॅन्टीन विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येतील अशी कॅफे चालकांना CRPC 149 प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
    काॅलेज मधील प्रेमी युगल  काॅलेज च्या  नावाखाली तासतास   या कॅफे कॅन्टींग मध्ये रोमांचक क्षण घालवत असल्याचे समजते. 
या कॅफे मध्ये प्रति तास ठराविक रक्कम आकारली जात असून त्याप्रमाणे त्या प्रेमी युगलाना मनसोक्त बसण्या करिता जागा तयार करून दिली आहे.या कॅटीनची रचना अशा रितीने करण्यात आली आहे कि, बाहेरुन आत मध्ये काय चालत आहे हे कोणालाही लवकर कळत नव्हते एकांतातले क्षण या ठिकाणी पैशाच्या तराजूत मोजले जात होते.या कॅफे कॅन्टीन मध्ये चहा घ्या अगर घेऊ नका मात्र एक तासांसाठी ठरविक रक्कम हि ठरलेली असायची.त्यामुळे काॅलेज मधील विद्यार्थ्यांचे हे कॅफे कॅन्टीन आकर्षण बनल्याने येथे नको ते कृत्य घडत असल्याचे निदर्शनास आले .काॅलेज च्या  नावाखाली येथे काय काय चालते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 
     काॅलेज प्रशासनाला देखील या घडत असलेल्या प्रकारा विषयी माहिती नसावी. जर त्याना हे माहीत झाले असते तर त्यांना या प्रकाराची कल्पना आली असती आणि त्यांनी लगेचच या विरुध्द पाऊल उचलले असते.सोन‌ईतील काही सामाजिक कार्यकर्त्यानी हा घडत असलेला सर्व प्रकार पोलीस प्रशासनाचा कानी घातला.काॅलेज रोड परिसरात अनेक हाँटेल आहेत मात्र त्यातील या दोन कॅन्टीन अल्पावधीतच काॅलेज मधील मुलांच्या पसंतीस उतरल्या आहेत.या मागील गुपीत काय.या आधी पोलीस प्रशासनाने वारंवार समज देऊन सुद्धा कॅफे कॅन्टीन वाले यांना काहीच फरक पडत नसल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी आपल्या फौज फाट्यासह या कॅफे कॅन्टीन वर बेधडक कारवाई केली आहे. या कारवाई मध्ये पोलीस निरीक्षक आदिनाथ मुळे,पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र गरजे,गोरक्षनाथ जावळे,अमोल भांड,सचिन ठोंबरे,वैभव क्षित्रे,ज्ञानेश्वर आघाव या पथकाने मोठी कामगिरी केली.

 (प्रतिनिधी , संभाजी शिंदे बी.पी.एस.लाईव्ह न्यूज नेवासे.)