डिग्रस ४२० प्रकरणातील आरोपींना मोकळे सोडण्या मागचा झांगडगुत्ता काय?

डिग्रस ४२० प्रकरणातील आरोपींना मोकळे सोडण्या मागचा झांगडगुत्ता काय?

डिग्रस जमिन घोटाळा अरोपींना अटक नाही फिर्यादीची पोलीस अधिक्षकाकडे पुन्हा तक्रार

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथे खोटे वारस लावून जमीन परस्पर हाडपण्यात आल्याने मुळ मालकानी जिल्हा पोलीस अधिक्षक अहमदनगर याचेकडे पुरव्यासह तक्रार दाखल केली होती सदर तक्रारीची दखल घेत पोलीस अधिक्षकांनी राहुरी पोलीसांना तपासाचे आदेश दिले राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक श्री बोकील ह्या प्रकरणाचा तपास करत आहेत तब्बल पाच सहा महीण्या नंतर ह्या जमीन घोटाळ्या बाबत फिर्याद दाखल करून घेऊन यातील अरोपीं पैकी केवळ दोघानाच अटक करून त्यांना जामीनही मंजुर झाल आहे मात्र या प्रकरणातील मुख्य अरोपींना अजुनही अटक झाली नाही म्हणुन यातील मुख्य फिर्यादी नाना तुकाराम पवार यानी मा जिल्हा पोलीस अधीक्षक याचेकडे पुन्हा तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की सदर माझ्या मुळ तक्रारी तील अरोपी रंभाजी बाबुराव गावडे हे तपासी अधीकारी पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील यांची वारंवार भेट घेत होता म्हणुन त्याचे नाव श्री बोकील यांनी फिर्यादीतुन वगळले असुन यातील उर्वरीत अरोपी राजरोस पणे तपासी अधिकारी निरज बोकीला यांचे समोर फिरत असताना त्यांना जानुन बुजुन अटक केली जात नाही त्या मुळे अरोपीं मार्फत सदर प्रकरण मिटवून घेण्यासाठी माझेवर दबाव आणला जात आहे तसेच या प्रकरणातुन श्री बोकील यांनी जानुन - बुजुन वगळेला मुख्य सुत्रधार रंभाजी गावडे हा मला जिवे मारण्याची धमकी देत आहे त्यामुळे हया अरोपीकडून माझे व माझे कुटुंबाच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून सदर अरोपींना तात्काळ अटक करावी तसेच अरोपीना सरळ - सरळ मदत करून पाठीशी घालणारे तपासी अधिकारी श्री निरज बोकील याचेकडुन तपास काम काढुन घेऊन हुशार व प्रामाणीक अधिकाऱ्या कडे सदर प्रकरणाचा तपास सोपविण्यात येऊन मला न्याय व सरक्षण द्यावे असेही ह्या तक्रारीत म्हटले आहे.