पाचुंदा येथे पीर साहेब बाबांच्या का वडीचे यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत.
*पाचुंदा येथे पीर साहेब बाबाच्या कावडीचे यात्रा कमिटीच्या वतीने स्वागत.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील सुरू असलेल्या पीर साहेब बाबांच्या ऊरुस निमित्त आलेल्या कावडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
पीर साहेब बाबाच्या कावडीसाठी अनेक तरुणांनी सहभाग घेतला होता. तर गावात आल्यानंतर यात्रा कमिटी त्यांचे भव्य स्वागत केले. व गावभर मिरवणूक फटाक्याच्या आतषबाजी मध्ये डीजेच्या गजरात पार पडली. व मिरवणुकीनंतर पीर साहेब बाबांना गंगेच्या कावडीने पवित्र करण्यात आले व विधिवत पूजा करण्यात आली.
या कावडीच्या स्वागतासाठी यात्रा कमिटी म्हणून पाचुंदा गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव चोपडे तसेच गावचे उपसरपंच अविनाश वाघमोडे ,ग्रामपंचायत सदस्य पोपट वाघमोडे ,अविनाश माने ,चंद्रकांत खरात ,सदाशिव कोकरे, तर युवा नेते भरत होंडे ,मा. चेअरमन साहेबराव होंडे, उमेश हंडाळ, नवनाथ माने, अंबादास माने, मीताजी कोकरे, संदीप गोफने ,आजिनाथ ठोंबरे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा भिसे, बाबासाहेब हंडाळ, बहिरनाथ होंडे ,संदीप माने, लक्ष्मण चोपडे ,भास्कर चांडे, नवनाथ शिंदे ,बाबासाहेब चांडे, कैलास शिंगटे, चांगदेव शिंगटे , राजेंद्र होंडे ,अशोक होंडे, मनाजी कोकरे ,हरिभाऊ होंडे ,भारत चंद ,मायनाथ शिंदे. व आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही यात्रा उत्सव व्यसनमुक्त करणार असल्याची माहिती देण्यात आली. परिसरातील आकर्षण व आदर्श यात्रा ठरणार आहे.