अनिल शंकरराव विधाटे सर यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या हस्ते कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार...

अनिल शंकरराव विधाटे सर यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या हस्ते कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार...

अनिल शंकरराव विधाटे

जन्मतारीख -28/10/1977

मु. पो. मानोरी ता. राहुरी जि. अहमदनगर

शिक्षण-B.A.D.ed.& Diploma in school management

शालेय शिक्षण (आजोळी झाले)-कुंभारी ता.कोपरगांव जि.अहमदनगर..

डी.एड_(1995-1997)

इंदिरा गांधी अध्यापक विद्यालय उपनगर नाशिक येथे झाले..

नोकरी ची सुरुवात _(जून 1998) पासून सुरू _आदर्श विद्यालय, औरंगाबाद रोड,(तवले नगर) अहमदनगर येथे झाली...

14/12/2001 ला जिल्हा परिषद बीड येथे नियुक्ती..

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर केंद्र सादोळा तालुका माजलगाव जिल्हा बीड..येथे 9 वर्षं एकाच गावात..

नंतर बदली होऊन 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाके वस्ती (मालेगाव) ता. गेवराई जि. बीड (2009 ते 2014)

2014 ला बदली झाली..

केंद्र शाळा कन्या उमापूर ता.गेवराई जि.बीड

केंद्र शाळा उमापूर येथे केंद्राचा केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून कारभार पाहिला..

उमापूर केंद्रातील 18 शाळा त्यावेळेस माझ्या अखत्यारीत चालत होत्या. बीड जिल्ह्यात अतिशय आदर्शव्रत काम केल्यामुळे आजही बीड जिल्ह्यात माझे नाव मोठ्या आदराने घेतले जाते..

बीड मध्ये असताना फिरोदिया प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते मिळाला..

2016 ला जिल्हा बदली झाली..

बीड मधून मी अहमदनगर जिल्ह्यात गंगाधरवाडी (वावरथ)ता.राहुरी जि.अहमदनगर येथे आजपर्यंत कार्यरत आहे..

गंगाधरवाडी ही शाळा मुळा धरणाच्या पलीकडे आहे..

गेल्या सात वर्षापासून मी रोज मुळा धरण पार करून होडीतून खडतर प्रवास करून शाळेला जातो..

आजपर्यंत प्रामाणिक काम केल्यामुळे माझे बीड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, आदर्श राजकारणी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे..

आपला विद्यार्थी काहीतरी चांगला घडला ही शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे..

नोकरी करत असतानाच मी 2003 सालापासून प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय या आंतरराष्ट्रीय अध्यात्मिक संस्थेचा सदस्य आहे..

आजपर्यंत अनेकांना मी व्यसनमुक्त, शाकाहारी व तणावमुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न केलेले आहे..

त्यामुळे नोकरी करून थोड्या फार प्रमाणात सामाजिक दायित्वाची मी जोपासना करत आहे..

अनेक सामाजिक कार्यात मी नेहमी सहभागी असतो.. आजपर्यंत 21 वेळा मी स्वतः रक्तदान केलेले आहे..

राहुरी तालुका शिक्षक मित्र मंडळाच्या माध्यमातून तालुक्यात मुलांना वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा या स्पर्धेत सहभागी करून ग्रामीण विद्यार्थ्यांना स्टेज डेअरिंग साठी प्रयत्न केलेला आहे...