औद्योगिक वसाहत श्रीरामपूर,खंडाळा,वाकडी रोड येथील plot no. C/89 Surface Coating कंपनीस इले. शाॅर्ट सर्किट मुळे लागली आग विझविण्यात यश

औद्योगिक वसाहत श्रीरामपूर,खंडाळा,वाकडी रोड येथील plot no. C/89 Surface Coating कंपनीस इले. शाॅर्ट सर्किट मुळे लागली आग विझविण्यात यश

BPS live news, Shrirampur. दि. २८/०३/२०२२ रोजी औद्योगिक वसाहत श्रीरामपूर,खंडाळा,वाकडी रोड येथील plot no. C/89  Surface Coating , कृष्णा यादव यांचे मालकीची कंपनी मध्ये दुपारी १२ः१५ चे दरम्यान इले. शाॅर्ट सर्किट मुळे आग लागली असण्याची शक्यता कंपनी मधील सुपरवायझरने मुलाखती वेळी सांगितले. उन्हाळा असल्याने तपमान ४2 डिग्री सेल्सिअस  होते म्हणून कमी वेळेत तात्काळ आगभडकली, बहुतेक कामगार सणाच्या निमित्ताने आपल्या गावी गेलेली असल्याने व स्थानिक दोन कामगारांवर आजचे काम चालू होते, मात्र या आगीत जिवीत हानी झाली नाही. लागलेली आग एवढी भयंकर होती की, कार्यशाळेची पत्रे जळून शेडसह खाली पडली ईले.डी पी जळून खाक झालेली दिसली. लागलेली आग विझविण्यासाठी प्रथम क्रमांकावर श्रीरामपूर नगरपालिका अग्निशामक पोहोचून आग विझविण्यासाठी मदत केली, तसेच ही आग विझविण्यासाठी अशोकनगर साखर कारखाना,गणेशनगर साखर कारखाना व फोम टाईप अग्निशामक हे शिर्डी संस्थानने वापरून आग विझविण्यात यश मिळवले, या आगीत कंपनीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. BPS LIVE NEWS...2022/09.SHRIRAMPUR.. Reporter..Nikale Prakash