ना तनपुरे यांनीच स्वताच बंद केलेल्या पाणी योजणा चालु केल्याचे श्रेय घेऊ नये व सोनई योजना त्वरीत चालु करावी =सुरेशराव लांबे पाटील
राहुरी प्रतीनिधी=ऐन उन्हाळ्यात ना तनपूरे यांनी स्वताच पाच पाणी योजना थकीत विजबिलाच्या नावाखाली बंद करुन 127 गावातील सर्व सामान्य नागरीकांची पिण्याच्या पाण्याची गैर सोय केली त्यावर आम्ही आंदोलन मोर्चाचा ईशारा दिल्यावर बांरागाव नांदुर 14 गाव,कुरणवाडी व 19 गाव,तिसगाव व 30 गावे,बु-हानगर व ईतर 44 गावे, या चार पाणी योजना ना तनपुरेच्या आदेशाने चालु झाल्याचे प्रसिध्द केले तरी ना तनपुरेनी स्वताच बंद केलेल्या पाणी योजना चालु केल्याचे श्रेय घेऊ नये व जनतेची दिशाभुल करु नये असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केला
लांबे पुढे बोलताना म्हणाले या योजना जर यांच्या आदेशाने व प्रयत्नाने चालु झाल्या तर ईतक्या दिवस कोणाच्या आदेशाने बंद होत्या त्याचा खुलासा ना तनपुरे यांनी करावा
सोनई,करजगाव व ईतर 16 गाव पाणी योजणा 16 मार्च पासुन थकीत विज बिलच्या नावाखाली बंद केली आहे 12 दिवस झाले मात्र ही योजना आजही बंदच आहे ही योजना चालु करण्याचे श्रेय ना प्राजक्त तनपुरे यांना देयाचे कि ना शंकरराव गडाख यांना द्यायचे या वादात ही योजना आजही बंदच आहे,याचे श्रेय कोणीही घ्या पण सोनई करजगाव पाणी योजना ईतर योजने प्रमाणे त्वरीत चालु करा व आपल्याच मतदार संघातील नागरीकाची पिण्याच्या पाण्याची गैर सोय करु नका अन्यथा आम्हाला या ज्वलंत प्रश्नावर ना विलाजाने या सोनई करजगाव पाणी योजना कार्यक्षेत्रातील सर्व बंधु भगिनीनां बरोबर घेऊन आंदोलन करावे लागेल याची शासन व प्रशासन यांनी त्वरीत दखल घ्यावी अन्यथा होणा-या परीनामास आपन जबाबदार रहाल असा आरोप करुन सुचक ईशारा सुरेशराव लांबे पाटील यांनी दिला.