अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्या प्रकरणी आरोपीला सक्त मजुरी -मा. विषेश जिल्हा न्यायाधीश श्रीमती.माधुरी एच मोरे यांची कार्यवाही
अहमदनगर:आरोपी नामे गणेश दादासाहेब सावंत वय -२० वर्षे रा. जोहारवाडी ता.पाथर्डी जिल्हा अहमदनगर याने अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी मा. जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीमती माधुरी एच मोरे साहेब यांनी आरोपी गणेश दादासाहेब सावंत यास भा. द.वि.का. कलम ३५४ अन्वये प्रमाणे दोषी धरून १ वर्षे सक्त मजुरी व १.000 रू. दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद आशि शिक्षा ठोठावली आहे.
या प्रकरणी सरकारी वकील म्हणून विशेष सरकारी वकिल श्रीमती मनिषा पी केळगंद्रे- शिन्दे यांनी काम पाहीले.
दि. ०८.०२.२०१९ रोजी सकाळी ०९.१५. चे सुमारास पीडीत अज्ञान मुलगी वय १२ वर्षे हि क्लास सुटले नंतर बिल्डींगच्या जिन्यावरून खाली उतरत असताना आरोपीने तीचा हात पकडून तिला आय लव्ह यु असे म्हणाला व कुणाला सांगु नको आशि धमकी दिली.
त्यानंतर पिडित मुलगी शाळेत रडत रडत गेली व सदरची घटणा ही तीने मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितली तसेच घरी गेल्यानंतर आई-वडिल व इतर घरच्यांना सांगितली त्यानंतर घटणा स्थळी जाऊन पीडीत मुलीने तीच्या वडिलांना आरोपी दाखवला त्यानंतर पीडीत मुलीसह तीच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला जाऊन आरोपी विरुद्ध फिर्याद दिली.
भा.द. वि.कलम ३५४ . ५०६ व पोस्को कायदा कलम ७ व ८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
पाथर्डी पो.स्टे.पो.कॉ.भिंगारदिवे यांनी विशेष सरकारी वकिल श्रमिती मनिषा पी. केळगंद्रे - शिन्दे यांना मदत केली व दि.२६ ०३ २०२२ रोजी या केसमधील आरोपीस जिल्हा विषेश न्यायाधिश श्रीमती माधुरी एच मोरे साहेब यांनी आरोपीस शिक्षा सुनावली.