शासकीय कृषि महाविद्यालय,नंदुरबार येथे जागतिक ग्रंथपाल दिवस तथा डॉ . एस . आर. रंगनाथन यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा .

शासकीय कृषि महाविद्यालय,नंदुरबार येथे जागतिक ग्रंथपाल दिवस तथा डॉ . एस . आर. रंगनाथन यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा .

शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथे जागतिक ग्रंथपाल दिवस तथा डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा स्मृतिदिन उत्साहात साजरा

              दिनांक. १२.०८.२०२५ रोजी महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथील ग्रंथालयात सर्व विध्यार्थी तसेच प्राध्यापक, कर्मचारी यांनी जागतिक ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा केला. भारतीय ग्रंथालयाचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांचा स्मृतिदिन सुद्धा साजरा करण्यात आला. यावेळी, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. यु. बी. होले यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच त्यांनी उपस्थित सर्व प्राध्यापक व विध्यार्थ्यांना डॉ. रंगनाथन यांच्या जीवनाबद्दल तसेच विध्यार्थी दशेत ग्रंथालयाचे महत्व याबद्दल माहिती दिली.

               सहाय्यक प्राध्यापक श्री. डी. बी. सूर्यवंशी यांनी डॉ. रंगनाथन यांनी सांगितलेल्या ग्रंथालयाच्या ५ तत्वांबद्दल माहिती सांगितली. महाविद्यालयाचे सहाय्यक ग्रंथपाल श्री. विशाल डी. जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव श्री. एस. डी. पाटोळे, डॉ. बी. एस. गुंजाळ, डॉ. के. व्ही. देशमुख, डॉ. बी.पी. बिरारी , श्री. ए. पी. खोंडे तसेच डॉ. एस. बी. आगळे हे उपस्थित होते.