काय ती शाळा, काय ती दिंडी, काय ते बाल वारकरी, काय तो मुलांचा रुबाब सगळं कसं एकदम ok मंधी.
नेवासा तालुक्यातील सलबतपुर येथील चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेचा बालदिंडी सोहळा आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर पालखी सोहळ्यात रुबाबदार अश्व, मुलांचे लेझीम पथक , पावली पथक विविध संतांच्या रूपातील विद्यार्थी, अश्वारूढ शिवाजी महाराज, व सादर करण्यात आलेले देखावे विशेष आकर्षक ठरले . दरम्यान महिला पालक वर्ग व ग्रामस्थ यांनी देखील दिंडीत सहभागी होऊन अभंग, हरिपाठ व गवळणी म्हणत दिंडीची शोभा वाढवली.
बाल वारकऱ्यांनी फुगडी खेळली. बाल वारकऱ्यांनी एकापेक्षा एक वेशभूषा केली होती. मुलांनी कुर्ती , फेटा , धोतर , टोपी , हातात भगवा झेंडा , गळ्यात टाळ तर मुलींनी नऊवारी साड्या परिधान केल्या होत्या. मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते.
पंढरपूरच्या वारी प्रमाणे बाल वारकऱ्यांची वारी ठरली. सदर दिंडी सोहळ्यासाठी नेवासा पोलीस निरीक्षक श्री विजय करे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदिच्छा भेट दिली. स्वतः करे साहेबांना व संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर बनसोडे सर यांना बाल वारकऱ्यांच्या सोबत फुगडी व पावली खेळण्याचा मोह आवरला नाही.
सदर दिंडी सोहळ्यास ग्रामस्थ पालकांसह डॉक्टर रवींद्र गोरे, प्रा.रवींद्र गावडे, प्रशांत मते, प्रमोद मते, विनोद मते, अविनाश विधाटे, महादेव गोरे, भास्कर गोरे, आप्पासाहेब गोरे, मयूर नागोडे, आदिनाथ निकम, शिवाजी गोरे, मनोज जंजाळे, बाळासाहेब साळुंके, नारायण कोहक, शहीद शेख तसेच
हिंदुत्व युवा प्रतिष्ठान च्या युवा कार्यकर्त्यांनी बहुमूल्य योगदान दिले.