नगर जिल्ह्यातील शेकडो छावे जाणार लातूरला.
*१६ एप्रिल कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती*
*नगर जिल्ह्यातील शेकडो छावे जाणार लातूरला....*
(राहुरी प्रतिनिधी) –शनिवार दि.९ एप्रिल रोजी शासकीय विश्राम गृह श्रीरामपूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.शनिवार दि.१६ एप्रिल २०२२ रोजी अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंती निमित्त लातूर येथे भव्य कार्यक्रम होणार आहे,या कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत.
या बैठकीत बोलतांना जिल्हाप्रमुख नितीन पटारे म्हणाले कि,कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांनी अ.भा.छावा संघटना उभी करून जनसामन्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आक्रमक छावा कार्यकर्ते निर्माण केलेले आहे.तेच छावा कार्यकर्ते आजही समाजासाठी अहोरात्र कार्य करत आहे.भावी पिढीला कै.अण्णासाहेब जावळे पाटील कोण होते ? हे समजण्यासाठी नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून नविन युवकांना लातूर येथे होणाऱ्या जयंती उत्सवासाठी घेवून यायचे आहे,व कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांनाच मराठ्यांचे क्रांतीसूर्य का म्हणतात हे दाखवून द्यायचे आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे म्हणाले कि,महाराष्ट्राच्या मातीत अनेक महापुरुषांनी समाजाला दिशा देत शेवटच्या श्वासापर्यत काम केले.अशा महापुरुषांच्या विचारांवर काम करत अठरापगड जाती व बारा बलुतेदार यांना सोबत घेवून छात्रपतिना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी उभा महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला असे अ.भा.छावा संघटनेचे संस्थापक कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्च्या जयंती निमित्त लातूर येथे नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून जिल्हा,तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी वाहनांमधून दि.१६ रोजी पाहते एकत्रित निघण्याचे ठरले आहे.लातूर येथे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून दुपारी लातूर येथे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.सायंकाळी भव्य कार्यक्रमांचे व व्याख्यानाचे नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा सचिव संभाजी निमसे निमसे म्हणाले कि नगर ते लातूर अंतर जास्त आहे.सध्या तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे.नगर जिल्ह्यातून जाणार्या कार्यकर्त्यांनी गुरवार पर्यंत जाणार्या वाहनाचे नंबर व कार्यकर्त्यांची नाव,संपर्क क्रमांक नोंदवावा.रस्त्यात काही अडचण आल्यास मदत पुरविली जाईल.तसेच कार्यक्रम स्थळी उशीर झाल्यास मुक्काम व्यवस्था नियोजन करता येयील.
या बैठकीस जिल्हा प्रमुख नितीन पटारे,जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे,जिल्हा मार्गदर्शक बहिरनाथ गोरे मामा,वि.आघाडी मार्गदर्शक लक्ष्मण कसबे सर,जिल्हा संघटक दादा बडाख,जिल्हा संपर्क प्रमुख सचिन गवळी,जिल्हा सचिव संभाजी निमसे,जिल्हा सरचिटणीस प्रवीण देवकर, ज्ञानेश्वर टेकाळे,रमेश पा.म्हसे,विजय बडाख,वीरेश बोठे,शैलेश धुमाळ,अनिल तळोले,राहुल नागुडे,अमोल पवार,संदीप गीते,परिमल दवंगे,प्रशांत पटारे,अतुल चौधरी,बाबासाहेब डांगे,सुहास निर्मळ,अक्षय पटारे,प्रकाश ढाकणे,संदीप गुंजाळ,शरद बोंबले, आदी उपस्थित होते.