भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांच्या वडिलांचे प्रथम पुण्यस्मरण पिंप्रि अवघड येथे संपन्न.

भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड यांच्या वडिलांचे प्रथम पुण्यस्मरण पिंप्रि अवघड येथे संपन्न.

    गेल्यावर्षी माणिकराव गायकवाड यांचे कोरोना च्या लाटेमध्ये दुःखद निधन झाले होते. एक कर्तबगार व्यक्तिमत्त्व ,सर्वांशी मनमिळावू स्वभाव, पंचक्रोशी मधील चारित्र्यसंपन्न दबदबा असलेले व्यक्तिमत्व असलेले नाना उर्फ माणिकराव गायकवाड यांना आपल्यातून जाऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यानिमित्ताने त्यांचे प्रथम पुण्यस्मरण पिंप्रि अवघड येथील हनुमान मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होते.

            यानिमित्ताने ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते या किर्तन सेवेचा सर्वांनी लाभ घेतला. नाशिवंत देह जाणार सकळ l आयुष्य खातो काळ सावधान ll या संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित कीर्तन सेवा महाराजांनी केली.

            त्यांच्या या वर्षश्राद्ध अर्थात पुण्यस्मरणानिमित्त पंचक्रोशीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये शिव प्रहार चे सुरेश लांबे, भारतीय पत्रकार संघटनेचे आर. आर जाधव, सचिन पवार, संभाजी शिंदे, युनूस पठाण, प्रशांत राजे शिंदे, यशवंत पाटेकर, प्रगत कराड, शिवाजी गायकवाड आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

            सर्वांनी गायकवाड कुटुंबाबद्दल असलेल्या प्रेमाचे कथन आपल्या श्रद्धांजली तून व्यक्त केले, माणिकराव गायकवाड हे जरी आपल्यातून गेले असले तरी कृष्णा गायकवाड यांना सर्वजण जिव्हाळ्याने व प्रेमाने माणुसकीने सहकार्य करतील अशी भावना व्यक्त करण्यात आली.

प्रमुख मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली यामध्ये

विक्रम पवार सर्कलअहमदनगर,

वसंतराव पवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर

नवघरे साहेब पोलीस उपाधीक्षक मुंबई 

            भारतीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंकज गुप्ता सर दिल्ली यांनी भ्रमणध्वनीवरून कृष्णा गायकवाड यांच्याशी संपर्क करून त्यांचे पिताश्री माणिकराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.