महात्मा फुले कृषी विद्यापीठ गेटसमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जय मल्हार ॲम्बुलन्सने तातडीने मदत*

महात्मा फुले कृषी विद्यापीठ  गेटसमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जय मल्हार ॲम्बुलन्सने तातडीने मदत*

*महात्मा फुले कृषी विद्यापीठ  गेटसमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; जय मल्हार ॲम्बुलन्सने तातडीने मदत*

*राहुरी, दि. 16 मे 2026*: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मुख्य गेटसमोर शनिवारी सायंकाळी 6:50 वाजता झालेल्या अपघात आढळगाव, ता. श्रीगोंदा येथील मधुकर गुलाब डोके, वय 48 वर्षे, यांचा जागीच मृत्यू झाला.

मधुकर डोके हे गुहा येथील पाहुण्यांकडे जात असताना MH 04  HY 3427 क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला 

पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ते एक सर्वसाधारण कुटुंबातील असून त्यांचा उदरनिर्वाह ते फेब्रिकेशन या कामावर त्यांचा प्रपंच चालत होता या या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर अत्यंत दुःख कोसळले असून सर्व आढळगाव तालुका श्रीगोंदा या गावातील सर्व जनतेतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

अपघाताची माहिती मिळताच जय मल्हार ॲम्बुलन्सचे भागवत वराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. राहुरी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील तपास सुरू आहे