पवनपुत्र हनुमंत रायाच्या सोहळ्याला उद्या दिनांक ६ पासून मोठ्या उत्साहात सुरुवात.

पवनपुत्र हनुमंत रायाच्या सोहळ्याला उद्या दिनांक ६ पासून मोठ्या उत्साहात सुरुवात.

*पवनपुत्र हनुमंत रायाच्या सोहळ्याला ६ रोजी उद्यापासून मोठ्या उत्साहात सुरुवात.*

तालुका (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती निमित्त गुरुवर्य शांती ब्रह्म भास्करगिरी जी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प गाथा मूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली अखंड हरिनाम सप्ताहाला उद्या दिनांक सहा रोजी पासून मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे.

     या सप्ताहकालात पहाटे ४ ते ६ काकडा ,९ ते ११ जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा पारायण , ११ ते १ भोजन ,सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ व रात्री ७ ते ९ नामांकित महाराजांची हरिकीर्तने असा दिनक्रम सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

  रविवार दिनांक ६ रोजी गाथा मूर्ती ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, सोमवार दिनांक ७ रोजी रामायणाचार्य ह भ प अमोल महाराज सातपुते, मंगळवार दिनांक ८ रोजी ह भ प ईश्वर महाराज शास्त्री, बुधवार दिनांक ९ रोजी राष्ट्रीय धर्माचार्य ह भ प जनार्दन महाराज मेटे, गुरुवार दिनांक १० रोजी रामायणाचार्य ह भ प सोमेश्वर महाराज गवळी, शुक्रवार ११ रोजी रामायणाचार्य ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री ,शनिवार १२ रोजी भागवताचार्य ह भ प योगेश महाराज जाधव या या नामांकित महाराजांची कीर्तने होणार आहेत. दररोज रात्री कीर्तनानंतर महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले आहे.

 तर रविवार दिनांक १३ रोजी सायंकाळी ७ ते ९ ह भ प गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री श्री .ज्ञानेश्वर आश्रम संस्था डोंगरगण यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तदनंतर सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

     हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी बजरंग दल समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ बालाजी देडगाव विशेष सहकार्य करत परिश्रम घेत आहेत. तर हा सोहळा हनुमान मंदिर प्रांगण येथे संपन्न होणार आहे.