रेशन अन्नधान्य वितरण व्यवस्था सुधारणे बाबत नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नेवासा तहसीलदार यांना निवेदन
प्रतिनिधी नगर
रेशन अन्नधान्य वितरण व्यवस्था सुधारणे बाबत नेवासा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नेवासा तहसीलदार यांना निवेदन.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की
निवेदन देत आहोत की वेळोवेळी निवेदने देण्यात येवून देखिल तालुक्यातील रेशन अन्नधान्य वितरण व्यवस्थामध्ये सुधारणा करण्यात आली नसल्याने आज आपल्या कार्यालयासमोर निदर्शने, आंदोलनं करण्यात आले. आंदोलनात प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. १). रेशन अन्नधान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा न बसविल्यांने वाहतुकी दरम्यान रेशन अन्नधान्य तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे जीपीएस सिस्टीम बसविण्याचे तातडीने आदेश द्यावेत. तसेच पुरवठा निरीक्षक यांनी गाडी मागे जावून या गाड्या व माल चेक करावा.
२). रेशन अन्नधान्य वितरण करणारे दुकानदारांकडून रेशंनचे पूर्णपणे वाटप करण्यात येत नाही. शिल्लक •माल काळ्या बाजारात विक्रीचे प्रमाण फार मोठे आहे. पुरवठा निरीक्षकाची भूमिका यात महत्वाची आहे परंतू पुरवठा निरीक्षक आपले कर्तव्यात कसूर करीत असल्याने सर्व प्रकार घडत आहे. त्यामुळे यास पुरवठा
निरीक्षकास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
३). नविन रेशन कार्ड धारकांना कूपन असूनही धान्य मिळत नाही. यासंदर्भात सर्व ग्रामपंचायती कडून एकत्रित ठराव घेवून रेशनचा कोटा वाढ करुन सर्व कार्ड धारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात यावे. ४). काही दिवसापूर्वी भानसहिवरे या ठिकाणी रेड मारून रेशन अन्नधान्यचा मोठा साठा जप्त केला रेशनचा काळा बाजार करणाऱ्यावर काय कारवाई केली याची स्पष्ट माहिती द्यावी. तसेच माल हस्तगत केला यावेळी पुरवठा निरीक्षक कुठे होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात का आली नाही? ते यास जबाबदार नाही का ? या प्रकरणात ठोस कारवाई करण्यात यावी ही मागणी आपणास करण्यात येत आहे.
वरील मागण्याची तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा येत्या काही दिवसांत मुंबई येथील मंत्रालयासमोर निदर्शने, आंदोलनं करण्यात येईल याची दखल आपणं घ्यावी.
अशी माहिती नेवासा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजीराव माळवदे यांनी दिली.
यावेळी तालुका भरतून आलेले अनेक नागरिक त्याचप्रमाणे काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आता या रेशन व्यवस्थेकडे नव्याने रुजू होणारे तहसीलदार लक्ष देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..