डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल, आगाशेनगर येथे शाळेत रस्ता सुरक्षा नियमाबद्दल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
श्रीरामपूर दि. ०३/०८/२०२३ :- डी पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल, आगाशेनगर येथे शाळेत रस्ता सुरक्षा नियमाबद्दल मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. डि पॉल इंग्लिश मिडीयम हायस्कूल, आगाशेनगर मध्ये आज रोजी रस्ता सुरक्षा नियमांबाबत पोलीस कार्यालय, श्रीरामपूर यांचे मार्गदर्शन करण्यात आले. व विद्यार्थ्यांना मोटर गाडी कशी चालवावी, बिगर लायसन मोटरसायकल न चालवण्याचे व पालकांना हेल्मेट घालून मोटारसायकल चालवणे कसे सुरक्षित, फोर व्हीलर गाडी चालवताना रस्त्याच्या डाव्या बाजूने व्यवस्थित चालवणे, ट्राफिक सिग्नल बघून गाडी चालवणे, सर्व वाहतुक नियम पाळणे, व्यवस्थित असे मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीरामपूर शहर पोलिस ट्राफिक कक्ष पोलिस कॉन्स्टेबल श्री. आदिनाथ माळी आणि पोलिस कॉन्स्टेबल श्री. ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी 8 वी ते 10 वी तील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियम व दंड याविषयी मार्गदर्शन केले यावेळी विद्यालयाचे व्यवस्थापक रेव्ह. फा. थॉमस मुख्याध्यापिका सि. सेलिन, क्रिडाशिक्षक संदिप निबेसर, विकास वाघमारे सर, गणेश पवार सर, सुनील बोरगे, दीपक कदम, विजू खरे व शिक्षिका स्नेहदलता वाणी, सुनयना भालेराव, सुनिता सोनवने, सेक्रेटरी स्वाती घोरपडे इत्यादी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या रस्ता सुरक्षा शिबीर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जयश्री ब्राह्मणे मॅडम यानी केले आणि श्रीरामपूर शहर पोलिस ट्राफिक कक्ष पोलिस कॉन्स्टेबल श्री. आदिनाथ माळी आणि पोलिस कॉन्स्टेबल श्री. ज्ञानेश्वर गुंजाळ यांचे, विद्यार्थ्यांना वाहतुक नियमांचे मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेतर्फे आभार मानले. Reporter..... Prakash Nikale, Shrirampur.