शिर्डीच्या श्रीरामनवमी यात्रेत दुर्घटना..डिस्को पाळणा तुटून चार जण गंभीर जखमी तर पाळण्याच्या बाहेर फेकल्या गेल्याने महिला जखमी..!!
शिर्डी ::--- दरवर्षी सालाबादप्रमाणे शिर्डी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रीरामनवमी यात्रा उत्सव भरत असते. त्यामुळे या ठिकाणीमोठ्या प्रमाणात राहाट पाळणे देखील लागत असतात. अनेक भाविक पाळण्यात बसण्याचा आनंद घेत असतात. त्यात शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास डिस्को पद्धतीचा पाळणा तूटल्याची मोठी दुर्घटना घडली.
शिर्डी या ठिकाणी साई संस्थांच्या प्रसादलयासमोर हे राहाट पाळणे लावण्यात आलेले आहेत. त्यातील एक खालीवर होणारा डिस्को पद्धतीचा पाळणा वेगाने फिरत होता. त्या वेगाने फिरणाऱ्या पाळण्यातील एक ट्रॉली पाळणा अचानक तुटल्याने त्या पाळण्यात बसलेले भाविक जोराने बाहेर फेकले गेले. व पाळण्यात बसण्यासाठी नंबर लावून उभे असलेल्या भाविकांवर या पाळण्याची ट्रॉली जोरात आदळल्याने ते भाविक देखील जबर जखमी झाले आहेत.एका भाविकाच्या पायाला गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे. जखमी झालेल्या सर्व भाविकांना तातडीने संस्थांच्या साईबाबा रुग्णालयात नेण्यात आले आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेश ओक व डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी तातडीने रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. यामध्ये डॉक्टर खुराना, डॉक्टर प्रशांत गोंदकर, डॉक्टर राजू तलवार, डॉक्टर समीर पारखे यांनी देखील जखमी रुग्णांना तातडीचे उपचार सुरू केले.जखमी मध्ये ज्योती किशोर साळवे (वय - 45),पोपट किशोर साळवे (वय -50) या दोघांच्या पायांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. याव्यतिरिक्त भूमी अंबादास साळवे (वय-14 )तिच्या डोक्याला जबरमार लागून तर प्रवीण आल्हाट (वय -45) हा तरुण ही जबर जखमी झाला आहे. या सर्व जखमींना साईबाबा रुग्णालयात मोफत उपचार करण्यात यावेत अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या गेल्या आहेत. घटना घडल्यानंतर शिर्डीचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आपल्या सहकार्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले.