राम कृष्ण जगन्नाथ बर्डे यांच्याकडून सावली दिव्यांग संस्थेकडून सन्मान

राम कृष्ण जगन्नाथ बर्डे यांच्याकडून सावली दिव्यांग संस्थेकडून सन्मान

रामकृष्ण जगन्नाथ बर्डे पाटील यांचा सावली दिव्यांग संस्थेकडुन सन्मान

पंचायत समिती शेवगाव येथे वरिष्ठ सहायक,समाज कल्याण विभागामध्ये कार्यरत असलेले रामकृष्ण जगन्नाथ बर्डे पाटील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने सावली दिव्यांग संस्थेकडुन सन्मानचीन्ह,

शाल,श्रीफळ देवुन सन्मान करण्यात आला.मागील तीन वर्षांपासून पंचायत समिती शेवगाव येथे काम करत असताना अनेक गोरगरीब दिव्यांग बांधवांच्या योजा तळागाळातील दिव्यांगापर्यंत पोहचवण्याचे काम श्री बर्डे साहेब यांच्या कारकिर्दीत केल्याने तालुक्यातील अनेक दिव्यांगांना योजनेचा लाभ मिळाला आहे श्री बर्डे यांची कारकीर्द कायम स्मरणात राहणार असल्याचे सावली दिव्यांग संस्थेचे चांद शेख यांनी सत्कार समारंभावेळी बोलतांना सांगीतले.सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनीही श्री बर्डे यांना पुढील कार्यासाठी दुरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.यावेळी सावली संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,

सचिव नवनाथ औटी,शहरअध्यक्ष गणेश महाजन,शहरउपाध्यक्ष सुनील वाळके,श्रीराम चव्हाण कक्ष अधिकारी साहेब,प्रभाकर गटकळ साहेब कनिष्ठ सहाय्यक,

सुभाष घूगे वाहनचालक,अंबादास झिरपे वृद्ध कलावंत,शकीला पठाण ग्रामसेवक ,लखमापुरीचे माजी सरपंच शरद चाबुकस्वार यांच्यासह आदी उपस्थित होते