बारागाव नांदूरचे आरोग्य केंद्र पूर्ण अपूर्णत्वाच्या वादामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत, नागरिकांचे हाल - जि.प. सदस्य धनराज गाडे.

बारागाव नांदूरचे आरोग्य केंद्र पूर्ण अपूर्णत्वाच्या वादामुळे  न्यायाच्या प्रतीक्षेत, नागरिकांचे हाल - जि.प. सदस्य धनराज गाडे.

गेल्या अनेक वर्षापासून बारागाव नांदूर चे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारती वाचून बंद होते. पूर्वीची इमारतही पूर्ण ढासळल्याने हे आरोग्य केंद्र नांदूरच्या जिल्हा परिषय प्राथमिक शाळेच्या खोल्यांमध्ये सुरु आहे .या आरोग्य केंद्रासाठी शासनाचा अडीच कोटी रुपयांचा निधी खर्चून अद्यावत व विस्तृत स्वरूपाची इमारत बांधून झाली आहे .सदर इमारतीचे बांधकाम होऊन नऊ महिने झालेले आहेत . गेली दोन अडीच वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांमध्ये आज तागायत चालू आहे . सदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या खोल्या अपंग विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत मात्र त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज चालू ठेवले आहे. या तीन खोल्यांमध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सेवा मिळत नाही त्यामुळे नागरिकांची आरोग्य सेवा मिळण्यापासून मोठी कोंडी झाली आहे.नवीन इमारत बांधून नऊ महिने पूर्ण होऊनही या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आडमुठेपणाचे धोरण धरून सदर इमारत ताब्यात घेण्यास टाळाटाळ करत आहे .गेल्या अकरा वर्षापासून या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी कार्यरत आहे त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकाऱ्याची मनमानी चालू आहे. या मनमानी कारभाराला वरदहस्त कुणाचा असा संतप्त सवाल पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये होत आहे.या इमारतीमध्ये लाखो रुपयांच्या अद्ययावत अशा वैद्यकीय सेवेसाठीच्या मशिनरी धूळखातपडून आहे सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीला टाळे लावल्याचे दिसत आहे . तसेच या इमारती उभ्या केलेल्या ॲम्बुलन्सखाली भटके कुत्रे आश्रय घेताना दिसून येत आहे .वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी सदर इमारतीचे बांधकाम अजून अपूर्ण असल्याचे पत्रकारांना सांगितले आहे.

          बारागाव नांदूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य धनराज गाडे यांची भेट घेतली असता सदरची इमारत पूर्ण बांधून झालेली असून त्यामध्ये सुसज्ज सुविधायुक्त वैद्यकीय साहित्य आणलेले असून सदर इमारत ताब्यात घेण्याबाबत अनेक वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगूनही वैद्यकीय अधिकारी ताब्यात घेण्यास टाळाटाळ करत आहेत .याचे कारण विचारले असता श्री धनराज गाडे म्हणाले की सदर इमारत ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांना 24 तास वैद्यकीय सुविधा पुरवावी लागेल व अधिकाऱ्यास 24 तास या दवाखान्यात उपस्थित रहावे लागेल म्हणून वैद्यकीय अधिकारी जाणून बुजून या दवाखान्याची इमारत ताब्यात घेण्यास टाळाटाळ करत आहे.

     

             अडीच कोटी रुपये खर्च करूनही सदरच्या आरोग्य केंद्रापासून नागरिकांना कोणत्याही वैद्यकीय सुविधा मिळत नाही .सदर इमारतीत खर्च केलेली अडीच कोटी रुपये मृत गुंतवणूक आहे की काय अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.वरिष्ठांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन पूर्ण क्षमतेने हे आरोग्य केंद्र चालू करून वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे

.