बारागाव नांदूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकार्‍यांच्या हयगईने बंद - धनराज शिवाजीराजे गाडे पा.

बारागाव नांदूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकार्‍यांच्या हयगईने बंद - धनराज शिवाजीराजे गाडे पा.

अनेक वर्षापासून बारागावनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राची हेळसांड होतांना दिसून येत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीची पडझड झाल्याने सदर आरोग्य केंद्राचे कामकाज अनेक वर्षापासून जिल्हा परीषद प्राथमीक शाळा बारागाव नांदूर येथे अपंग विद्यार्थांच्या सुविधासाठी असलेल्या तीन खोल्यांमध्ये चालु आहे

या प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनि इमारत पडझड झाली म्हणून त्याठीकाणी कै. शिवाजीराजे गाडे पा. यांच्या प्रयत्नाने अडीच कोटी रुपयाची नविन इमारत मंजुर करून आणली या इमारतीचे बांधकाम सुमारे दोन वर्षापासून चालु होते.

तेव्हापासून हे आरोग्यकेंद्र आज तागायत जि.प.प्रा.शाळेमध्ये चालु असून त्या ठिकाणी कोणत्याही वैद्यकीय सुविधा नागरीकांना वेळेवर मिळत नाहीत.

नविण सुसज्ज आशि इमारत पूर्ण होऊन सुमारे नऊ महिनेचा कालावधी झालेला आहे तसेच या आरोग्य केंद्रात लाखो रुपयाचे वैद्यकीय साहीत्य आज रोजी धुळखात पडून आहे.

मात्र नमुद आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना सदरची इमारत ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली असल्याचे दिसून येत आहे.

बा.नांदूर जि.प. गटाचे सदस्य धनराज पा. गाडे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता श्री गाडे म्हणाले की सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून याठीकाणी लाखो रुपयाचे वैद्यकीय साहीत्य व मशिनरी आणून ठेवलेल्या असून सदर इमारत ताब्यात घेऊन चालु करणेबाबत नमुद वैद्यकीय अधिकार्‍यांना वेळोवेळी सूचना / विनंती करूनही ते ताब्यात घेतनाहीत याचे कारण विचारले असता गाडे म्हणाले की सदरचा दवाखाना ताब्यात घेतल्या नंतर नागरीकांना चोवीसतास वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी लागेल व त्याकरीता वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांना चोवीसतास हजर रहावे लागेल या भितीपोटी वैद्यकीय अधिकारी यांनी सदर दवाखाना ताब्यात घेण्यास टाळाटाळ करून अडेलतट्टू पणाचे धोरण आवलंबिले आहे.

 वैद्यकीय अधिकार्‍यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की सदर इमारतीचे कामकाज अपूरे असल्याने आम्ही सदरील इमारत ताब्यात घेतली नाही.

लोक प्रतिनिधिंच्या व जनतेच्या मते सदर दवाखान्याचे बांधकाम पूर्ण झालेचे समजते तर अधिकार्‍यांच्या मते कामकाज अपूर्ण असलेचे ऐकविले जाते या पूर्ण अपूर्णवताच्या वादात सदरील इमारत अक्षरशा: धुळ खात पडून असून याठीकाणी भटक्या कुत्र्यांनी आश्रय घेतला असल्याचे दिसत आहे.

सुमारे अडिच कोटी रुपयाची गुंतवणूक करून बांधलेला दवाखाना बा.नांदूर पंचक्रोशितील नागरीकांना असून घात नसून खोळंबा आशि अवस्था झाली असून सदरच्या इमारतीसाठी खर्च केलेला पैसा ही मृत गुंतवणूक आहे काय? असा संतप्त सवाल नागरीकांतून होत आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अडेलतट्टु पणाचे धोरण सोडून देऊन सदरचा दवाखाना ताब्यात घेऊन नागरीकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुण द्याव्यात त्यासाठी वरीष्ठांनी या गंभिर बाबींकडे विषेश लक्ष द्यावे आशि जनतेतून जोरदार मागणी होत आहे.