शिर्डी लोकसभा निवडणुकीत स्वच्छ व प्रामाणिक नवा चेहरा : अनिल भोसले.

शिर्डी लोकसभा निवडणुकीत स्वच्छ व प्रामाणिक नवा चेहरा : अनिल भोसले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - देशाच्या राजकारणात, समाजातील सर्व घटकांचा समावेश असला पाहिजे. सातत्याने केवळ पर्याय नाही म्हणून त्याचं त्या उमेदवारांना मत देणे ही काही वेळा अपरिहार्यता असते. प्रस्थापित राजकारण्यांच्या गदारोळात प्रामाणिक आणि स्वच्छ विचारधारेचा सामान्य माणूस झाकला जातो. अशी बरेचदा मतदारांची भावना असते. ती त्यांच्या खासगी चर्चेत देखील असते. 

                 सन २०२४ च्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात असाच एक स्वच्छ, प्रामाणिक नवीन चेहरा अनिल भोसले यांच्या माध्यमातून दिसणार आहे. 

                अनिल भोसले यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेबरोबरच सर्व धर्मीय संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ते महाराष्ट्रात समाज सेवेचे काम करीत आहेत. परंतू समाज सेवा करीत असताना कोठेतरी राजकीय भूमिकेची गरज आवश्यक असल्याची जाणीव भोसले यांनाही जाणवली. त्यांच्या सेवा क्षेत्रातील लोकांनीही अनिल भोसले यांनी उमेदवारी करावी हा आग्रह भोसलेंकडे व्यक्त केला आहे. म्हणूनच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा मनोदय केला असल्याचे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले आहे.  

                  भोसले हे तरुण व धडाडीचे कार्यकर्ते असून जिल्ह्याबरोबरच राज्यमध्येही ख्रिस्ती समाज संघटन वाढीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अल्पसंख्यांक मागासवर्गीय समाजावर झालेल्या अन्यायाला प्रतिकार करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. समाजाच्या प्रश्नाची त्यांना जाण असून उपोषण, आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले आहे.

                 भोसले हे शुद्ध चारित्र्य व प्रामाणिकपणा यामुळेच समाजामध्ये असलेली त्यांची प्रतिमा, याबरोबरच सर्व धर्मीयांशी जोडलेली नाळ, दांडगा संपर्क या सर्व बाबींचा विचार करून भोसले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, सॉलोमन गायकवाड,  निशिकांत पंडित, सुरेश ठुबे, योगेश भालेराव, राजेंद्र गायकवाड, आशिष बनसोडे, फेडरी फर्नांडिस, फिलिप कदम, प्रकाश लोखंडे, अजित सुडके, अविनाश काळे, राजूभाऊ इनामदार, अनिल ब्राह्मणे, मार्कस बोर्डे, किरण चांदेकर, अंतोन भोसले, वसंत बनसोडे, प्रभाकर चांदेकर, आदींसह सर्व सामाजिक स्तरातून मागणी होत आहे.