चाईल्ड करीयर इंग्लिश स्कूल सलबतपुर येथे वृक्षांना राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे.
*चाईल्ड करिअर स्कूल वृक्षांना राख्या बांधून मध्ये अनोखे रक्षाबंधन साजरे*
नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील शिस्त, गुणवत्ता, संस्कृती, संस्कार जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर तकॉलेज मध्ये अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.मुलींनी सर्वप्रथम स्वहस्ते पर्यावरण पुरक बीज राख्या तयार केल्या.शाळेचे शिक्षक अभिजित अरगडे,शिक्षिका रेणुका गोरे यांनी विविध आकाराच्या बिया पासून बीज राखी बनविण्याची कार्यशाळा घेऊन बीज राखी बनविण्याची प्रात्यक्षिक मुलांना दाखवले.सदर कार्यशाळेत तयार झालेल्या राख्या मुलींनी आपले रक्षण करणाऱ्या, सावली, फळे,फुले,व प्राणवायू देणाऱ्या वृक्षांना बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
टाकाऊ पासून टिकाऊ,कलेतून निर्मिती,निर्मितीतून पर्यावरण व पर्यावरणातून सण अशा अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वृक्षा विषयी , निसर्गाविषयी नकळत आपलेपणाची भावना रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष सागर बनसोडे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने तसेच त्यांच्यातील सर्जनशीलतेचा विकास करण्याच्या दृष्टीने शाळा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करत असते.अशी माहिती प्राचार्य संदीप खाटीक यांनी दिली.
वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व,व वृक्षांचे विविध उपयोग,तसेच नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन विषयी प्रा.संजय गारुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक अभिजित अरगडे, शिक्षिका रेणुका गोरे, शाहरुख सय्यद,विजय खाटीक,स्वाती गायकवाड,अमोल इंगळे, छाया सातपुते,यांनी परिश्रम घेतले.सदर उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आ
हे.