माळीचिंचोरा येथील लाखेफळ येथे रक्षाबंधन निमित्ताने वृक्षाबंधन साजरा करून अनोखा उपक्रम..

माळीचिंचोरा येथील लाखेफळ येथे रक्षाबंधन निमित्ताने  वृक्षाबंधन साजरा करून अनोखा उपक्रम..

नेवासा तालुक्यातील माळीचींचोरा येथे आज गुरूवार दि. 31 रोजी जि.प प्राथ शाळा लाखेफळ येथे रक्षाबंधन निमीत्ताने *वृक्षाबंधन* साजरा करण्यात आला.

       यानिमित्त विद्यार्थ्यांनी झाडांच्या पानाफुलां पासून सुंदर , शुशोभित राख्या तयार केल्या व त्या जे झाडी आपल्याला कायम शुद्ध ऑक्सीजन देतात त्यांना आपण जपणे हे आपले कर्तव्य आहे . म्हणून, 

*निसर्ग माझा सखा*

*गाऊ किती अख्यायिका*

*वृक्षाबंधन साजरे करून*

*दावू प्रेम अन् करूया*

*रक्षण अन्* 

 *संवर्धन*

या राख्या शाळेच्या प्रांगणातील प्रत्येक झाडांना औक्षण करून बांधण्यात आल्या . तसेच विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक राख्या बांधून हे वृक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे करून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला . या आपल्या वेगळ्या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा होत आहे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाखेफळ यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

          या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मोलाचे योगदान दिले.