ला .प्र.वि .पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या कारवाईने राहुरी तालुक्यातील आरोग्य विभागात खळबळ ,10000 रु ची लाच घेताना डॉ.वृषाली सूर्यवंशी (कोरडे) यांना रंगे हात पकडले .
प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वृषाली कोरडे ए सी बी च्या जाळ्यात
राहुरी प्रतिनीधी
राहुरी बारागावनांदूर प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ. वृषाली सुर्यवंशी - कोरडे याना लाच लुचपत पथकाने रंगेहात पकडुन जेरबद केले आहे या बाबत सुत्रांकडून समजलेली सविस्तर माहिती अशी कि नमुद अरोपी वैद्यकीय अधिकारी डॉ कोरडे यानी अरोग्य विभागात नोकरीत असलेल्या समुदाय अरोग्य अधिकारी त्यांचा माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महीण्याचा कामावर आधारीत मोबदला व प्रोत्साहन भत्ता आणी ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्त्याची बिले मंजूर करण्यासाठी भेट घेतली असता आरोपी डॉ श्रीमती वृषाली कोरडे यांनी एकुन बिलाच्या अर्ध्या रकमेची मागणी केली होती त्या वेळी तक्रारदार महीला समुदाय अरोग्य अधिकारी यानी दिनांक नाइलाजास्तव त्याचे जवळ असलेले डॉ. कोरडे यांना ४५०० रुपये दिले होते त्या नंतर तक्रारदार ह्या पुन्हा बिलासाठी दि ३ / २ / २०२३ रोजी अरोपीना भेटल्या असता त्यांचेकडे पुन्हा बिलाच्या एकुन रकमेच्या अर्ध्या रकमेची मागणी केली तक्रारदार याची पैसे देण्याची इच्छा नसताना तडजोडी अंती रक्कम रु १०००० . देण्याचे कबुल करून लाच लुचपत प्रती बधक विभागाशी संपर्क साधुन कारवाईची मागणी केली दिनाक ६ / २ / २०२३ रोजी अॅन्टी करप्शन विभागाने सापळा रचून अरोपीस रंगेहात पकडून अटक केली सापळा अधिकारी पोलीस उप अधिक्षक ला प्र वि अहमद नगर हरिष खेडकर , पोलीस अंमलदार रविंद्र निमसे , वैभव पांढरे , बाबासाहेब कराड , महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के चालक पोलीस हवालदार हरुण शेख इत्यादीनी ही कारवाई केली.