नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कै.संदीप ( झुंबर )वांढेकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कै.संदीप ( झुंबर )वांढेकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन.

आज बालाजी देडगाव येथे मकर संक्रांतीच्या निमित्ताने कै. संदीप वांढेकर यांच्या स्मरणार्थ बजरंग दल शाखा देडगाव व जनकल्याण रक्तपेढी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन ह. भ .प .सुखदेव महाराज मुंगसे व ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक बाजीराव मुंगसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह. भ. प . सुखदेव महाराज यांनी बजरंग दलाच्या माध्यमातून कायम सामाजिक उपक्रम राबवले जातात. तसेच या गावातील बजरंग दल हे धार्मिक कामात अग्रेसर आहे. या शिबिरासाठी तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा जरी धर्माचे रंग वेगळे असले तरी सर्व धर्माच्या जातीच्या लोकांच्या रक्ताचे रंग लालच आहेत .रक्तदान श्रेष्ठदान मानले जाते .बजरंग दलाने पुण्याचं काम हाती घेऊन कै. संदीप याला या माध्यमातून खरी श्रद्धांजली वाहिली असे प्रतिपादन केले. या शिबिरास विद्यमान उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर, माजी चेअरमन शिवाजीराव बनसोडे ,बजरंग दलाचे अध्यक्ष सागर मुंगसे, उपाध्यक्ष शिवाजी काजळे, किशोर वांढेकर ,नवनाथ तिडके ,पोपट मुंगसे ,गणेश आवटी, ग्रामपंचायत सदस्य सचिन मुंगसे, सा.बा .अभियंता महेंद्र मुंगसे ,गणेश मुंगसे सर ,चाइल्ड इंग्लिश स्कूल चे संस्थापक सागर बनसोडे सर, शिवाजी ससाने व बजरंग दलातील सर्व सदस्यांनी या शिबिरासाठी कष्ट घेतले. तसेच जनकल्याण रक्तपेढी डॉक्टर व सर्व कर्मचारी या शिबिरासाठी यांनी अनमोल योगदान दिले.