गणोरे येथे राहुरी कृषी विद्यापीठाच्या वतीने एक दिवशीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न .
गणोरे येथे राहुरी कृषी विद्यापीठाच्यावतीने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण संपन्न
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागातील क्षमता असलेल्या पिकांवरील आ.भा.सं.सं.प्रकल्प, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील गणोरे येथे १ मार्च २०२४ रोजी एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले
या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमानिमित्त विद्यापीठाच्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून राजगिरा, चारधारी वाल, करटोली, किनोवा, व सिमारूबा या पिकांबद्द मार्गदर्शन केले तसेच या पिकांचे मानवी जीवनात क्षमता असलेल्या पिकाचे उपयोग व आहारतील महत्व तसेच या पिकांच्या दुर्मिळ वाणांचे जतन करणे याबद्दलची माहिती डॉ. विजू अमोलिक व डॉ. मुकुंद भिंगारदे यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी वनस्पतीशास्र विभागाचे प्रमुख डॉ.विजू अमोलिक हे होते तर या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती क्षमता असलेल्या पिकांवरील आ.भा.सं.सं.प्रकल्पाचे रोप पैदासकार डॉ.मुकुंद भिंगरदे , प्रकल्पाचे कृषी सहाय्यक बापू अडसुरे व गणोरे गावातील उपसरपंच शरद बहीरम, पोलीस पाटील नंदू गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते राम चौरे , ग्रामपंचायत सदस्य आपासाहेब चौरे, दौलत चौरे, शांताराम दळवी, रुपाली धनराज गांगुर्डे, नीलम हेमंत गांगुर्डे यासह गावातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना क्षमता असलेल्कया पिकांवील आ.भा.सं.सं. प्रकल्पाच्यावतीने भोजन व ट्रेनिंग किटचे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी या प्रकल्पाचे कृषी सहाय्यक श्री. बापू अडसुरे व अतुल डाडर, रावजी पठारे यांचे सहकार्य लाभले.