श्रीरामपूरमध्ये भारतीय संविधान दिन संविधान गौरव रॅली काढून उत्साहात साजरा. .! !
श्रीरामपूर. .
संपूर्ण भारतात 26 नोव्हेंबर हा *भारतीय संविधान दिन* म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा होतो. श्रीरामपूर शहरात त्याचेच औचित्य साधून आज शनिवार दिनांक 26/11/2022 रोजी दुपारी 4 वाजता श्रीरामपूर तालुक्यातील सर्व संविधान प्रेमी नागरिक , संघटना यांचे वतीने *संविधान गौरव रॅलीचे आयोजन* करण्यात आले होते. त्यामध्ये नागरिक आपल्या संपूर्ण कुटुंबासह आपल्या मित्र परिवारासह या *संविधान गौरव रॅलीत* मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. संविधान जागृती समितीच्या वतीने गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते..या रॅलीमध्ये खालील संघटना सहभागी झाल्या होत्या. चर्मकार संघर्ष समिती,
महाराष्ट्र राज्य व श्रीरामपूर, त्रिदल सेवा संघ श्रीरामपूर,, परिवर्तन फाउंडेशन श्रीरामपूर,, स्वतंत्र समता शिक्षक संघ श्रीरामपूर,
परिवर्तन शिक्षक मित्र,
प्रेरणा विचार मंच संघटना श्रीरामपूर,
एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य,
भीम पँथर सामाजिक संघटना श्रीरामपूर,
पेन्शनर्स असोसिएशन शाखा श्रीरामपूर इ.या सर्वांनी सहभाग नोदंवला.
*संविधान गौरव रॅलीने या मार्गानं मार्गक्रमण केले*
सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ अभिवादन व संविधानाच्या उद्देश्य पत्रिकेचे वाचन करून व अशोक स्तंभाला अभिवादन करून रॅली महात्मा गांधीजींना अभिवादन केले.त्यानंतर
मेनरोड मार्गे – अभिवादन (नगर पालिका) करून
छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सय्यद बाबा चौक मार्गे
दशमेश नगर कमान मार्गे
कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्याला अभिवादन करून तसेच मदर तेरेसा यांना अभिवादन (प्रांत कार्यालय) करून राष्ट्रपिता महात्मा फुले व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करून पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ रॅलीचे विसर्जन करण्यात आले रॅली अंत्यंत उत्साहाने घोषणा देत पार पडली.
त्याप्रसंगी अशोक दिवे सर,सतिश जाधव, पी.एस.निकमसर,, सूभाष तोरणे,जाॅन लोखंडे,दिपक कदम,भाऊसाहेब तोरणे सर, विजयराव खाजेकर,मेजर सरदार दिनकर मोरे,प्रेमचंद वाघमारे, इक्बाल काकर,बागवान सर,सुहास धनेधर,गोरख आढाव,शिवाजीराव गांगुर्डे, महेंद्र दादा त्रिभुवन ,डॉक्टर संजय दुशिंग ,सुरेश ठुबे, बागवान इब्राहिम शेख,आरिफ शेख, इब्राहिम बागवान, झाकिर चांद, फिरोज पठाण,सुरेशराव कांबळे, अशोक बोरुडे साहेब, सावंत साहेब, उत्तम दाभाडे साहेब, रणपिसे सर,शैलाताई अहिरे, जाधव मॅडम,प्रदीप दळवी, नितीन जाधव, मुकुंद सोनवणे सर , डाॅ.धस,जीवन सूरुडे इ.सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.