नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सावळा गोंधळ.

नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सावळा गोंधळ.

नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सावळा गोंधळ.     

         

               सोन‌ई : -नगर जिल्ह्यात केवळ विनंती बदलीला प्राधान्य शासकिय बदल्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष नगर जिल्ह्यात विशिष्ट भागात दहा ते बारा वर्षांपासून एकाच कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या वर्ग तीन व चार कर्मचाऱ्यांचा म्हणजे ग्रामसेवकांच्या बदल्या प्रशासकिय नियमानुसार झालेल्या नाहीत त्यामुळे अनेक कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीचा काळात किंवा बदलीसाठी अपेक्षित असलेल्या गावात बदली मिळण्यापासून वंचित आहेत तरी प्रशासनाने सदर गोष्टींचा तातडीने विचार करून या निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी ग्रामसेवक संघ अहमदनगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. शासकिय नियमानुसार दहा टक्के बदल्या या प्रशासकीय नियमानुसार होणे अपेक्षित असते परंतु या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. नगर जिल्ह्यात झालेल्या विनंती बदल्या या रद्दबातल करुन प्रशासकिय बदल्या कडे शासनाने लक्ष देणे हे शासकिय नियमानुसार आवश्यक आहे.                                 

 

          महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये वरील शासन निर्णय २०१४ नुसार प्रशासकीय बदल्या दहा टक्के न केल्याने अनेक वर्षांपासून पंधरा पंधरा वीस वर्षांपासून ठराविक ग्रामसेवक त्याच तालुक्यात ठाण मांडून आहेत त्यामुळे अनेक बदली पात्र गामसेवकावर अन्याय होत आहे फक्त विनंती बदल्या पाच टक्के केल्या आहेत विनंती अर्ज असुनही त्या तालुक्यात एकुण ग्रामसेवक अतिरिक्त असल्याचे सांगुन अर्ज ही नाकारण्यात आली तसेच प्रशासकिय बदल्या केले असते तर प्रत्येक तालुक्यातील दहा वर्षांच्या ज्या सेवा झालेली ग्रामसेवक दुसर्या तालुक्यात गेले असते आणि त्या तालुक्यात सगळ्यात कमी झाल्यामुळे विनंती अर्ज मंजुर करता आले असते पण प्रत्यक्षात तसे घडलेच नाही त्यामुळे विनंती अर्ज धडा धडा नाकारण्यात आले आणि तालुक्यात अतिरिक्त ग्रामसेवक असलेचे सांगुन प्रशासकिय बदल्या ही दहा टक्के केल्या नाहीत त्यामुळे सर्वसामान्य ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसते .