घोडेश्वरी देवीचे सतरा किलो चांदी चे मखर चोरी तपासाचे ए पी आय आशिष शेळकेंं समोर आव्हान.
श्री घोडेश्वरी देवीचे सतरा किलो चांदी चे मखर चोरी तपासाचे ए पी आय आशिष शेळके समोर आव्हान.
घोडेगाव (वार्ताहर) दि अठरा नोव्हेंबर २०२०रोजी येथील ग्राम दैवत श्री घोडेश्वरी देवीचे सतरा किलो चांदीचे सुबक नक्षीकाम केलेले चार भागातील चांदीच्या मालाची चोरी झाली होती . त्याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. नागरिक आणि भाविक यांच्या श्रध्दा आणि भावनांशी निगडीत असलेल्या सव्वातिन वर्ष लालफितीत अडकलेल्या या तपासाचे आव्हान नव्याने सोनई पोलीस स्टेशन येथे रुजु झालेले एक पी आय आशिष शेळके समोर आव्हान आहे. हा तपास ते करतील का?की तसाच बासनात गुंडाळून ठेवणार असे अनेक प्रश्न नागरिकत्व भाविकांना आहेत.
अठरा नोव्हेंबर २०२०मधे चोरी झाली . पोलीस अधीक्षक,शेवगाव डि वाया एस पी सुदर्शन मुंडे, श्वान पथक,ठसे तज्ञ येऊन गेले . तपासाची आश्वासन दिली गेली. एक डिसेंबर २०२०रोजी तपासाला गती नाही म्हणून नागरिकांनी गाव बंद रास्ता रोको नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर केला ,सातशे सध्याचे निवेदन दिले. शेवगाव चे डि वाया एस पी सुदर्शन मुंडे यांनी एक संशयीत ताब्यात घेतल्याचे सांगितले .पंधरा दिवसांत पुर्ण तपास करण्याचे आश्वासन दिले.आंदोलन संपले.
सोनईचे तत्कालीन ए पी आय रामचंद्र कर्पे यांच्या कार्यकालात तपास लागला नाही. त्यांची जवळच असलेल्या शिंगणापूर येथे बदली झाली . त्यांचे जागेवर माणिक चौधरी रुजु झाले . त्यांना या विषयाची ,गुन्ह्याची ,तपास करण्याची विनंती करण्यात आली. परंतु बासनात गुंडाळून ठेवलेल्या तपास काही सुरु झाला नाही.चौधरी यांचे जागी आता आशिष शेळके रुजु झाले.त्यांनी ह्या तपासाचे आव्हान स्वीकारून ते पुर्ण करावे. श्री घोडेश्वरी देवीचे सतरा किलो चांदीचे मखर पुन्हा मिळवुन द्यावे.अशी मागणी व चर्चा नागरिक व भक्ता मधुन सुरू आहे. आशिष शेळके हे आव्हान पएलतईल का?यांचे उत्तर आगामी काळच देईल.
सन २०१६ मधे लोकवर्गणीतून सतरा किलो चांदी घेतली.कोल्हापुरच्या कारागीरांकडुन राहुरी चे भडकावल या सोनाराने मखराचे पाच भागांत सुबक नक्षीकाम करुन घेतले. १८-११-२९रोजी चोरी झाली सव्वातीन वर्षात तपास नाही.
२८/२९एप्रील २०२४ रोजी देवीची पाच दिवस यात्रा तो पर्यंत तपास होऊन मखर परत मिळावे भक्त नागरिकांची मागणी .