नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राहुरी शहरात विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांनी गाडीसह घेतले ताब्यात

नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राहुरी शहरात विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांनी गाडीसह घेतले ताब्यात

गहुरी ता प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

*नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राहुरी शहरात विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस राहुरी पोलिसांनी गाडीसह घेतले ताब्यात*

  

   दिनांक 30/11/2025 रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांना गोपनीय माहिती मिळाली की राहुरी शहरातून स्विफ्ट गाडीमधून देशी विदेशी दारूची वाहतूक होणार आहे. त्यांनी तश्या सूचना करून सदर ठिकाणी तात्काळ पोलीस पथक रवाना केले. सदर सूचनेप्रमाणे पोलीस पथकाने राहुरी शहरातील प्रगतीशाळा परिसरात सापळा लाऊन संशयित स्विफ्ट कार ताब्यात घेऊन कारची तपासणी केली असता सदर गाडीत एक देशी दारूच्या 48 बाटल्यांचा बॉक्स व 12 बियर बाटल्यांचा बॉक्स असे दोन विनापरवाना दारूचे बॉक्स गाडीत मिळून आले. सदर 6800 रु किमतीची दारू व 2,50000 हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण 2,56,000/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून, सदर गाडी वरील चालक नामे विजय सोमनाथ मगर, वय 42 रा. श्रीरामपूर याचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1324/2025 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे , मा .अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात राहुरी पोलीस स्टेशनचे डीबी पथकाने केलेली आहे.