महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषदेच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्काराने विनोदजी राक्षे यांना सन्मानित करण्यात आले.
श्रीरामपूर ( वार्ताहर ) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषदेच्या माध्यमातून समाजभूषण पुरस्काराचे वितरण श्रीरामपूर येथील लोयोला दिव्यवाणी नाॅर्दन ब्रॅच या ठिकाणी करण्यात आले. सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मूहर्तावर समाजकार्य करणारे, माजी शिक्षण समितीचे सभापती,कोपरगावचे माजी नगरसेवक विनोदजी राक्षे यांना समाजभूषण पुरस्कार २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीचे औचित्य साधून श्री.विनोदजी राक्षे यांना ट्रॉफी,शाल, श्रीफळ व बुके देऊन रे.फा.अनिल चक्रनारायण, नगरसेवक दिपक चव्हाण, दिपक कदम,पा.राजेश कर्डक,पा.आण्णा अमोलिक,पा.प्रविण शिंदे यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी विनोद राक्षे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी अनेक दिव्यागं अधं कूटूबियांना केलेली मदतीची माहिती दिली.समाजात काही कूटूंब स्वाताकडे काही नसतानाही जनतेच्या दिलेल्या मदतीवर त्यांनी त्यातून मदत केलेची उदाहरणे दिली.एवढेच नव्हे तर अंध कूटूबियांना घराचे पत्रे फक्त ३ दिवसांत मिळून दिलेले त्यांनी आपल्याकडील व्हिडिओ द्वारे दाखवून दिले. तसेच प्रकाश निकाळे सर यांना महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेने केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला.तर संतोष कोळगे टेलर मामा खबरदार या कविता सादर करून शिवाजी महाराजांचा इतिहासातून आपले प्रकट केले.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले,रे.फा.अनिल चक्रनारायण,प्रताप देवरे, पा.राजेश कर्डक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रप्रमुख उत्तम शेलार सर, ख्रिस्ती समाजाचा बुलंद आवाज,नॅशनल कौन्सिलचे प्रविणराजे शिंदे,अविनाश काळे, अजितकुमार सुडगे, राजू साळवे, प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे,विशाल पंडीत ,पा.दिपक शेळके,प्रमोद संसारे, नितीन जाधव, संतोष गायकवाड, निशिकांत पंडीत, विलास पठारे, राजू भोसले, मुख्याध्यापक उबाळे सर,श्रीमती वर्षा साळवे, सुनिल संसारे, चंद्रकांत येवले, डॉ.संजय दुशिंग, अशोक बार्शी , संजय साळवे सर, संतोष कोळगे मामा इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षांची निवड निशिकांत पंडीत यांनी केली तर प्रा.भाऊसाहेब तोरणे यांनी सुत्र संचालन केले तर आभार जिल्हाध्यक्ष दिपक कदम यांनी मांडले. Delhi91 Bps LiveNews Reporter Deepak Kadam Shrirampur.