अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त: सौ. धनश्रीताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त: सौ. धनश्रीताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त: सौ. धनश्रीताई विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती.

आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आश्वी बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात व एकात्मतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महिला मंडळ, आश्वी बुद्रुक यांनी केले होते.

या भव्य कार्यक्रमात सौ. धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि आपल्या प्रेरणादायी भाषणातून उपस्थितांमध्ये नवा उत्साह निर्माण केला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा दर्जा अधिकच वृद्धिंगत झाला.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांमध्ये भारतीय दलित महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलराव उमाप, जिल्हाध्यक्ष हिना उबाळे.

सामाजिक कार्यकर्ते - प्रसाद घोगरे, सागर राक्षे, विकी राक्षे, विजयराव शेलार, विलास कदम, दिपक भांड, विशाल शिरसाठ, रोहित जोशी, विलास ससाणे, शरद भडकवड, संतोष बर्डे, विशाल आव्हाड, अमन शेख, शुभम गडाख यांची विशेष उपस्थिती लाभली..

कार्यक्रमात आयोजन - जया साळवे, अलका साळवे, मीना प्रकाश भांड, सुनंदा कदम, तसेच भाऊसाहेब साळवे, लक्ष्मण साळवे, सागर कदम, देविदास शेलार, किरण साळवे, नवनाथ ताजणे, किरण गायकवाड, रामदास साळवे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ, महिला, तरुण कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावकऱ्यांची एकजूट, महिलांचा सक्रीय सहभाग आणि तरुणाईचा जोश यामुळे कार्यक्रम सामाजिक ऐक्याचे आणि बांधिलकीचे प्रतीक ठरला.

कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. त्यानंतर गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अन्नदानाच्या कार्यक्रमाने या जयंती उत्सवाची सांगता झाली.