राहुरी पोलिस ठाण्याच्या बलात्कारी PSI ला तात्काळ अटक करण्यात यावी.विलासनाना साळवे RPI तालुका अध्यक्ष.

राहुरी पोलिस ठाण्याच्या बलात्कारी PSI ला तात्काळ अटक करण्यात यावी.विलासनाना साळवे RPI तालुका अध्यक्ष.

राहुरी पोलीस ठाण्याच्या बलात्कारी पोलीस अधिका-ला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी राहुरी पोलीस ठाण्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने लक्षणिय उपोषण छेडण्यात आले बलात्कारी पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

राहुरी पोलीस ठाण्यामधे एका कामानिमित्त आलेल्या महिलेशी ओळख करून त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन पोलीस उपनिरीक्षक सज्जन ना-हेटा याने तिला एका खाजगी रूमवर बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा राहुरी पोलीसात दाखल झाला आहे गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले तरी आरोपीला अटक न केल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आक्रमाक झाले आहेत आरोपी पोलीस अधिकाऱ्याला पाठीशी न घालता तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रविणजी लोखंडे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली सुनिता थोरात, सोमल थोरात, उज्वला संसारे, स्मिता तुपे,यमुनाताई भालेराव,स्नेहल सांगळे, प्रियंका सगळगिळे, रूकसना पटेल, अनुसया शिंदे,सुनील चांदणे,सचिन साळवे,अतुल ञिभुवन,शिरीष गायकवाड,आयुब्ब पठाण. दिवे माजी सरपंच कनगर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.