श्री स्वयंभू गणेशा उत्सवानिमित्त आव्हाने येथे विविध धार्मिक कार्यक्रम

श्री स्वयंभू गणेशा उत्सवानिमित्त आव्हाने येथे विविध धार्मिक कार्यक्रम

श्री स्वयंभू गणेश उत्सवा निमित्त आव्हाणे येथे विविध धार्मिक कार्यक्रम.

 

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी,शेवगाव 

 

शेवगाव:- शेवगाव तालुक्यातील आव्हाणे बु निद्रिस्त गणपती मंदिर येथे मंगळवार दि.19 सप्टेबर ते गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर या कालावधीत कार्यक्रम संपन्न होत आहे.उद्या गणेश चतुर्थी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

      सकाळी 7 वा पैठण वरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने श्रीची अरती व महाभिषेक सर्व गणेश भक्तांच्या उपस्थित संपन्न होईल.तसेच दररोज सकाळी सहा ते नऊ या वेळेत श्री गणेश पुराण वाचन होईल.व दररोज सकाळी दहा ते सहा श्री गणेश जपाचे आयोजन केले आहे.दुपारी 12 ते 2 या वेळेत भाविकांना फराळाची व्यवस्था श्री.हरीचंद्र रामकिसन घोडेचोर पाटील यांच्यावतीने करण्यात आली आहे.व सायंकाळी सात वा.श्री ची आरती व महाभिषेक सर्व गणेश भक्तांच्या उपस्थित संपन्न होईल.तसेच बुधवार दि.20 रोजी ऋषीपंचमीनिमित्त 10 ते 12 या वेळेत सार्वजनिक भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.त्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था कै.जेष्ठराज शंकर भालेराव यांच्या स्मरणार्थ श्री. डॉ.अशोक जेष्ठराज भालेराव यांच्या तर्फे करण्यात आलेली आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा.तसेच मंगळवार दि.19 ते बुधवार दि.27 रोजी दररोज रात्री नऊ ते अकरा आव्हाणे पंचक्रोशीतील भजनी मंडळ व दादोबा देव एकतारी भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम होईल.व गुरवार दि.28 रोजी श्री गणेश पुराण ग्रंथाची समाप्ती व तीर्थप्रसादाचे आयोजन गणपती मंदिर ट्रस्ट ने केलेले आहे.तरी या धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.असे अवाहन निद्रिस्त गणपती आव्हाणे बु टस्टचे अध्यक्ष प्रा.मालोजीराव भुसारी,सरचिटणीस अर्जुनराव सरपते मा.विश्वस्त अंकुश कळमकर,कारभारी तळेकर,रामदास दिवटे,सुधाकर चोथे,नारायण जाधव,सचिव लक्ष्मण मुटकुळे यांनी के

ले आहे.