हरिहर नाम जपाने बिल्व बन दुमदूमले
बेलापूर पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री हरिहर केशव गोविंद बन येथे भाविकांची वर्षभर गर्दी असते. श्रावण महिन्यात ही संख्या लाखांच्यावर असते. येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी येथील देवस्थान ट्रस्ट सदैव तत्पर असते. भविकांना व्यवस्थित दर्शन होऊन, अभिषेक, प्रसाद याची व्यवस्था बरोबरच ग्रंथ पारायण इत्यादी सोयी केल्या जातात. या वर्षी हरिहर केशव गोविंद नामस्मरण, जप मशीन, व धून स्थानिक गायकांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. केशव गोविंद यांचे नामस्मरण जप बैरागी, भीम पलास, यमन व तोडी या रागामध्ये , हरिहर भजन धून व प्रवरामातेची आरती बेलापूर येथील योगेश परांजपे व त्यांची सुकन्या सर्वेश्वरी यांच्या सुरेल आवाजात आणि नेवासा येथील कृष्णा कुलकर्णी व त्यांच्या साथीदारांच्या संगीत संयोजनात ध्वणीमुदरीत करण्यात आली. या वेळी प पु मोहन काका खानविलकर यांनी मार्गदर्शन केले.
बुधवारी 23 जुलै रोजी संत शिरोमणी सावतामहाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने सायंकाळी या ध्वनी मुद्रानाचे विमोचन करण्यात आले. या ध्वनीमुद्रानाचे विमोचन प्रसंगी सर्व सहभागी कलाकारांचा सन्मान करण्यात आला.त्यांचा सत्कार प पू मोहन काका खानविलकर, ह भ प विर महाराज व ह भ प कुहिले महाराज यांच्या हस्ते पुष्पहार, श्रीफळ देऊन करण्यात आला. या ध्वनीमुद्रण प्रसंगी विराट परांजपे याने टाळांची सुरेख साथ केली. या सत्कार प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त, व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर ह भ प कुहिले महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.
शास्त्रीय संगीता च्या चालीमध्ये नामस्मरणा मुळे वातावरण भक्तिमय झाले होते. श्रावण महिन्याच्या सुरवातीला हरीहरांचे नामस्मरणाचे ध्वनी मुद्रन मोबाईल वर ऐकता येत असल्यामुळे भाविकांमध्ये संतोष व्यक्त होत आहे.


Kishor Bhagat






