अँड. योगेश गाडेकर यांची राहाता तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड.

अँड. योगेश गाडेकर यांची राहाता तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड.

अँड. योगेश गाडेकर यांची राहाता तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

राहाता (प्रतिनिधी) – राहाता शहरातील नामवंत कायदेविशारद आणि समाजसेवक अॅड. योगेश भागूनाथ गाडेकर यांची राहाता तालुका नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सय्यद अली, कार्यरत तालुका अध्यक्ष यशवंतराव खराडे आणि सचिव प्रवीण नलावडे यांच्या हस्ते गाडेकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

अँड. योगेश गाडेकर यांनी एलएलबी शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहाता न्यायालयात वकिली व्यवसायास सुरुवात केली. २०१८ साली अल्पवयातच नोटरी पब्लिक सदस्य होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. त्यांनी समाजासाठी कायद्याच्या माध्यमातून विशेष कार्य केले असून, शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना, अनाथ व वृद्धाश्रमातील नागरिकांना तसेच सैन्यात भरती होणाऱ्या युवकांना मोफत नोटरी सेवा उपलब्ध करून दिली आहे.

अँड. गाडेकर यांच्या सामाजिक आणि कायदेशीर कार्याची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा विशेष सन्मान केला असून, राहाता तालुक्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.

स्थानिक न्यायव्यवस्था आणि जनतेच्या सेवा क्षेत्रात नवी दिशा देण्याच्या उद्देशाने अॅड. गाडेकर आपले नेतृत्व यापुढेही प्रभावीपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.