बहुमूल्य शोभेच्या वस्तू हस्तिदंत ,औषधे यांची तस्करी करणारी टोळी वाहतूक करणाऱ्या साधनांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद.

बहुमूल्य शोभेच्या वस्तू हस्तिदंत ,औषधे यांची तस्करी करणारी टोळी वाहतूक करणाऱ्या साधनांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद.

प्रतिनिधी संभाजी शिंदे

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धूम स्टाईलने चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्या मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की नगर -औरंगाबाद रोडवर जेऊर टोलनाकया नजीक दोन इसम हस्ती दंत विक्री करण्यासाठी घेऊन येणार आहेत. सदरची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिली.

         घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नियुक्त करण्यास सांगितले व त्याप्रमाणे पथक नियुक्त करून सूचना व मार्गदर्शन करून घटनास्थळी पथक रवाना केले.

         त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फौलाने, रवींद्र शेलार, पोलीस नाईक भीमराज खर्से,सुरेश माळी,शंकर चौधरी, रवी ,पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाने, व मच्छिंद्र बर्डे या पथकाने योजनाबद्ध पद्धतीने खाजगी वाहनाने जाऊन वेशांतर करून जेऊर टोल नाका येथे सापळा लावून थांबले. थोड्याच वेळात दोन संशयित इसम टोलनाका परिसरात संशयास्पद रित्या फिरताना आढळून आले. त्यापैकी एका जणाजवळ मिलिटरी रंगाची सॅक होती, सेक मधून काहीतरी भागवर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता.

थोड्यावेळ थांबल्यानंतर सदर इसमाजवळ एक ग्रे रंगाची कार घेऊन थांबली कारमधून चार जण खाली उतरले.

           नंतर त्यांची डिल चालू झाली. सुरुवातीला आलेल्या दोन्ही इस्मानी हस्तिदंत सारखी वस्तू बाहेर काढून समोरच्या व्यक्तीला दाखवत होता .त्याविषयी त्यांच्यात चर्चा चालू होती.

        ज्या वस्तूची डिल चालू होती ते हस्तिदंतच आहे ही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची खात्री झाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच त्यांच्यावर झडप घातली. पकडलेल्या इसमांना याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हस्तिदंत खरे असून ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिली .

त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता.

 १)व्यंकटेश दुर स्वामी .वय ४०

      राहणार वाकडी फाटा दरेवाडी ,अहमदनगर

 २) महेश बाळासाहेब काटे वय 30 राहणार आखेगाव तालुका शेवगाव.  

३ त्यांच्याकडे हस्ती दंतबाबत विचारपूस केली असता त्यांनी शेवगाव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदारांबाबत त्यांनी काळया बाजारातून हस्तिदंत विक्री करण्यासाठी आले आहे असे सांगितले .

     याबाबत सदरचे हस्तिदंत कुठून आलेले आहेत याचा शोध स्थानिक गुन्हे शाखा अधिक कसून चौकशी करून घेत आहे.

     यादरम्यान ग्रे रंगाची आय 20 कारमधुन आलेल्या व ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नावे.

१) महेश भगवान मरकड वय २६ राहणार गल्ले वस्ती तालुका शेवगाव.

२) सचिन रमेश पन्हाळे वय ३३

राहणार आखेगाव तालुका शेवगाव.

३) निशांत उमेश पन्हाळे वय २५राहणार भगतसिंग चौक शेवगाव.

४) संकेत परशुराम नजन वय ते 30 राहणार पवार वस्ती तालुका शेवगाव.

असे सांगितले त्यांच्याकडून विचारपूस केली असता त्यांना व्यंकटेश दूरई स्वामी व महेश काटे यांच्याकडून हस्तिदंत खरेदी करण्यासाठी आलो आहे असे सांगितले.

         सदर घटनेबाबत उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तिदंताचे प्राथमिक परीक्षण केले असता हे दात असल असून बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधे आधी करिता वापरण्यात येत असतात.

             हस्तिथंतांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे मात्र दातांची किंमत जाहीर केल्यास हत्तीच्या दातांच्या तस्करीचे व हत्तींच्या हत्येचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यास बंदी घातलेले आहे.

      सदर घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात या इसमान विरुद्ध भादवी कलम ४२९, सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ २(१६),९,४९(बं),५०व५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

 सदरचे कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,

उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग अजित पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.