बालाजी देडगाव येथिल दिंडीचे पंढरपूर कडे मोठ्या उत्साहात प्रस्थान.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी उभाटे महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे यांच्या प्रेरणेने ही दिंडी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली. असता दिंडीचे ग्रामस्थांच्या वतीने व मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
या गावची दिंडी अतिशय वैभवशाली व सुसंस्कृत असणारी ही दिंडी गावापासून ते पंढरपूर पर्यंत अतिशय शिस्तप्रिय समजली जाणारी ही दिंडी अतिशय उत्साहाने निघत रस्त्याने ही या दिंडीचे मोठे स्वागत केले जाते.
प्रथमता दिंडीचे स्वागत बालाजी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. यावेळी अध्यक्ष व सर्व विश्वस्त उपस्थित होते तर यानंतर ग्रामपंचायत देडगाव च्या वतीने ह भ प सुखदेव महाराज यांना शाल श्रीफळ देऊन या दिंडीचे स्वागत करण्यात आले. त्यापुढे श्री संत रोहिदास देवस्थानच्या वतीने ही स्वागत करण्यात आले .तर महाराष्ट्राची संस्कृती समजली जाणारी सर्व समभाव असणारी संस्कृती प्रमाणे मुस्लिम समाजाच्या वतीनेही दिंडीचे स्वागत करण्यात आले.
या दिंडीच्या स्वागतासाठी गावचे ज्येष्ट नागरिक व कारखान्याचे संचालक बाजीराव पाटील मुंगसे, माजी सभापती कारभारी चेडे ,विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे ,उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे ,ग्रामसेवक उल्हारे भाऊसाहेब, तलाठी बालाजी मलदोडे भाऊसाहेब तर संत रोहिदास प्रतिष्ठान चे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, चद्रभान कदम, मुस्लिम समाजाच्या वतीने अकबर भाई पठाण ,खान साहेब पठाण ,इस्माईल पठाण ,अन्वर सय्यद ,ह भ प राजाराम महाराज , पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, बन्सी पाटील मुंगसे सुभाष मुंगसे, किशोर मुंगसे, दत्ता पाटील मुंगसे, पत्रकार विष्णु मुंगसे,बालाजी भजनी मंडळ व आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनीधी युनूस पठाण बालाजी देडगाव .