बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कै. सोपानराव वांढेकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कै. सोपानराव वांढेकर यांचे अल्पशा आजाराने निधन.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कै .सोपानराव किसनराव वांढेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . तरी त्यांच्या जाण्याने देडगाव परिसर हळहळ व्यक्त करत आहे.

        धार्मिक कुटूंबातील असणार व्यक्तिमत्व , बालाजी जय हरी भजनी मंडळाचे सक्रिय सदस्य, कायम पंढरपूर वारी करणारे वारकरी, त्यामूळे भगवंत बालाजी रायाने त्यांना देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तच्या रूपाने सेवा करण्याची संधी दिली होती . 

        अतीशय गरीब प्रपंच त्यांनी आपल्या कष्टाने फुलवला होता . अतीशय सुखाचे दिवस आले होते. परंतू नियतीला काही वेगळेच मान्य होते. अचानक काळाने त्यांच्यावर घाला घातला व वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

       त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, ,सुना, जावई, भावजय,असा मोठा वांढेकर परिवार आहे.

        ते प्रगतशील शेतकरी व पाचुंदा ग्रामपंचायत चे कर्मचारी किशोर वांढेकर यांचे वडिल होते.

         त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि.११ /१/२०२३ रोजी   १० वाजता रामेश्वर मंदिर प्रवरा संगम (जुने कायगाव ) येथे होईल. व तेरावा शनिवार देि.१४/१/२०२३ रोजी राहत्या घरी १० वाजता

होइल.