हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहातील श्रीमद् भागवत कथेने दुमदुमली बालाजी नगरी हजारो भाविकांची उपस्थिती.

हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहातील श्रीमद् भागवत कथेने दुमदुमली बालाजी नगरी हजारो भाविकांची उपस्थिती.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे शंतिब्राम्ह ,ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज यांच्या अधिपत्याखाली हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 

        बजरंग दलाच्या व ग्रामस्थ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी ह भ प लक्ष्मण महाराज शास्त्री आळंदी देवाची यांच्या मधुर रसाळ वाणीतुन श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

       दररोज पहाटे 4 ते 6 या वेळात काकडा भजन,9 ते 11 श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण,11 ते 1 भोजन व सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ व 8 ते 10 श्रीमद भागवत कथेचे आयोजन केले आहे. व रात्री वेगवेगळ्या गावचे जागर व कबीरपंथी भजनाचे आयोजन केले जाते.

      या कार्यक्रमास कथेतील काही रंगीत संगीत प्रात्यक्षिक, वेगवेगळी रूपे, वेगवेगळी रंग भुषा कथेतील विदारक सत्य प्रसंग सादर करण्यात येत आहे. श्रीमद् भागवत माहात्म्य, श्री परिक्षीत राजास शाप, सृष्टीची उत्पती कथा, धृवबाल चरित्र, भगवान् श्रीकृष्ण जन्मोत्सव, बाललीला, गोवर्धन पूजा, कांस वध, व श्रीकृष्ण विवाह सोहळा, भक्त सुदामा चरित्र, परिक्षीत मोक्ष ग्रंथपुजा याचे प्रात्यक्षिक होनार आहे. तरी या कथेला सुरुवात झाल्यापासून परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. हा आगळा वेगळा कार्यक्रम नेवासा तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. कथेच्या शेवटी श्रीरामाची, हनुमानाची आरती घेतली जाते. व या आरतीसाठी नवनवीन विवाहित जोडपी मोठ्या आनंदाने सहभागी होतात. या परिसरात मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या अखंड हरिनाम सप्ताहास बजरंग दल व सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मोलाचे कष्ट घेत आहेत.

बी पी एस.

न्यूज नेवासा तालुका प्रतिनिधी युनूस पठाण बालाजी देडगाव.