परिवहन महामंडळाकडून शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांना एक दिवशीय विद्यार्थ्यांच्या प्रवासा बाबत दक्षता कार्यशाळेचे आयोजन. .. !!

परिवहन महामंडळाकडून शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांना एक दिवशीय विद्यार्थ्यांच्या प्रवासा बाबत दक्षता कार्यशाळेचे आयोजन. .. !!

श्रीरामपूर ::--
श्रीरामपूर येथे शालेय परिवहन समितीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक ,वाहक व चालक यांना विद्यार्थीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्वाची माहिती व सूचना परिवहन महामंडळाच्या समिती च्या वतीने देण्याच्या कार्यशाळेचे करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या सूचनेचे पालन करावे अशी अपेक्षा परिवहन समितीने शाळा व्यवस्थापन समितीकडून केली आहे.
    अनेक विद्यार्थी परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करीत असतात. त्यामुळे विद्यार्थी कोणत्या गाडीने बस ने प्रवास करीत आहे त्याकडे शालेय व्यवस्थापनाचे लक्ष असणे गरजेचे आहे. यामध्ये शाळेय वाहतूक त्याचप्रमाणे अनेक शाळांमध्ये स्वतःच्या मालकीच्या स्कूल बसेस आहेत. कमिटीच्या माध्यमातून शाळेने विद्यार्थी वाहतूक बसची कागदपत्रे नेहमी स्वतःजवळ बाळगावीत.तसेच बस मध्ये मध्ये  प्रथमोपचाराची पेटी,अग्निरोधक साहित्य व्यवस्थित ठेवावे. शाळेने वाहक,चालक,मदतनीस व विद्यार्थी यांची वेळोवेळी नियमितपणे तपासणी केली जावी. विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करणार नाही ,चालक  मद्यपान करणार नाही यांची दक्षता शालेय व्यवस्थापन समितीकडून वेळोवेळी घेतली जावी.यासारख्या विविध प्रकारची नियमावली व दक्षता परिवहन समिती कडून घेण्यात यावी असे  शालेय व्यवस्थापनाला सांगितले.तसेच वाहन कसे चालवावे याबाबतचे मार्गदर्शन व प्रक्षिशण चालक व वाहक यांना देण्यात आले.
   यावेळी परिवहन समितीचे सर्व सदस्य,मोटार वाहन निरीक्षक श्री.विनोद घनवट ,सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री.हेमंत त्रिभुवन,सुरेश शिंदे, पठारे सर, दादाभाई मगरे पोलीस अधिक्षक, गटशिक्षणाधिकारी सामलेटी मॅडम,सेंट झेवियर इंग्लिश मेडीयमचे स्कूल चे प्राचार्य रे.फा.टायटस,डी पाॅल इंग्लिश मेडीयमचे प्राचार्य रे.फा.थाॅमस इ.सह अनेक शिक्षक व पालक देखील उपस्थित होते.
प्रतिनिधी -दिपक कदम बी.पी.एस.न्यूज .श्रीरामपूर. .! !