श्रीरामपूर येथे दिव्यांग कायदे व योजना जनजागृती मेळावा. .! !

श्रीरामपूर येथे दिव्यांग कायदे व योजना जनजागृती मेळावा. .! !

श्रीरामपूर :
मूकबधिर विद्यालय श्रीरामपूर, रोटरी क्लब श्रीरामपूर, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग अहमदनगर, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शुक्रवार दि २ डिसेंबर रोजी सकाळी ठिक 9 वाजता *दिव्यांग कायदे व योजना जनजागृती मेळावा* श्रीरामपूर मूकबधिर विद्यालय यांठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती प्रमूख संयोजक अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे व मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष जोशी यांनी दिली.
  दिव्यांग जनजागृती मेळाव्याचे उद्घाटन श्रीरामपूरचे आमदार मा. लहुजी कानडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमात दिव्यांग कायदे संदर्भात प्रसिद्ध कायदेतज्ञ मा. अँड प्रमोद सगळगिळे व शासकीय योजना संदर्भात श्रीरामपूरचे तहसीलदार मा प्रशांत पाटील व श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गणेश शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमासाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा. डॉ योगेश बंड, रोटरी एज्युकेशन ट्रस्ट चेअरमन मा. सुरेश पाटील बनकर, सचिव मा. नारायणभाई पटेल, रोटरी क्लब श्रीरामपूर अध्यक्ष मा. ऋषिकेश बनकर, सचिव मा.अभिजीत मुळे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव मा.वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. मुश्ताकभाई तांबोळी, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. स्नेहा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. श्रीरामपूर मूकबधिर विद्यालयातून सकाळी ठिक 9 वाजता *दिव्यांग प्रबोधन रॅली* निघणार आहे जनजागृती मेळावा सकाळी ठिक 10 सुरु होणार आहे. यामध्ये श्रीरामपूर नगर परिषद आरोग्य विभागामार्फत *आभा आरोग्य कार्ड नोंदणी* केली जाणार आहे. तसेच श्रीरामपूर तहसील कार्यालय निवडणूक शाखेमार्फत *पदवीधर मतदार नोंदणी* केली जाणार आहे. तरी सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींनी येताना दोन पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, जिल्हा रुग्णालय प्रमाणपत्र, पदवी/पदविका किंवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका, निवडणूक कार्ड, रेशन कार्ड या कागदपत्रांसह उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा. राधाकिसन देवडे, रोटरी क्लबचे विनोद पाटणी आसान दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सुनिल कानडे जिल्हाध्यक्ष विश्वास काळे खजिनदार सौ. साधना चुडिवाल, तालुकाध्यक्ष किशोर ताठे यांनी केले आहे..