डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर शहर व तालुका राष्ट्रीय दलित पँथर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास सत्यजीत तांबे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन केलं.

संगमनेर ( प्रतिनिधी) :- सर्व भारतभर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर शहर व तालुका राष्ट्रीय दलित पँथर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमास श्री. सत्यजीत तांबे यांनी भेट दिली. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पांजली अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन केलं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समाजाला दिशा कशी देत आहेत आणि समतेचा लढा अधिक बळकट कसा करत आहेत, यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेबांचे विचार, संविधान आणि सामाजिक समतेचा संदेश हेच आपले खरे प्रेरणास्थान आहेत असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.