बालाजी देडगाव मध्ये यंदा मुलींनी बाजी मारली. अहिल्याबाई होळकर शाळेत कु. मुंगसे तनुजा दत्तात्रय प्रथम तर तक्षशिला इंग्लीश स्कूल ला म्हस्के प्रीती व साक्षी घोडके प्रथम.
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील(SSC ) दहावीच्या झालेल्या परीक्षेमध्ये आज दि. 17 रोजी दहावीचा निकाल मध्ये देडगाव बोर्ड मध्ये कु. मुंगसे तनुजा दत्तात्रय हिना 93.60% गुन मिळवून सर्वप्रथम बाजी मारली. ही मुलगी अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेतील आहे.
अहिल्याबाई होळकर शाळेत द्वितीय क्रमांक चि. तांबे गौरव खंडेराव 93% तर तृतीय क्रमांक कुमारी मुंगसे हर्षल कल्याण 92.60% टक्के गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले .शाळेचा निकाल 97 .91 % लागला असून या शाळेतील मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर व सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे कष्ट घेत अभिनंदन केले.
तसेच देडगाव मधील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल याही शाळेचा 100% निकाल लागत शाळेमधील मस्के प्रीती ज्ञानेश्वर व घोडके साक्षी ज्ञानदेव यांनी 88.40% गून मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. व श्रावणी जितेंद्र देशमुख यांनी 88.20% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तर श्रद्धा रमेश कुटे ,सिद्धार्थ गणेश चे डे , प्रज्वल भास्कर चेदे
87 .80 % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. या शाळेतील मुख्याध्यापक विठ्ठल कदम सर व सर्व शिक्षक वृंद यांनी मुलाचे कष्ट घेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशाने देडगाव परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी मुलींनीच बाजी मारत घवघवीत यश मिळवले आहे. म्हणून मुलींचे पाल्य अगदी जास्त आनंदित आहेत.
या देडगाव मधील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील मुंगसे , मा. उपसभापती कारभारी चेडे ,मार्केट कमिटीचे संचालक कडूभाऊ तांबे, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम ,माजी संचालक लक्ष्मण राव बनसोडे , जेष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके, विद्यमान सरपंच चंद्रकांत मुंगसे, उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर , सामाजिक विभाग जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाने,माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, माजी सरपंच रामेश्वर गोयकर, व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, बालाजी पाणीवाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, प्रगतशील बागातदार शेतकरी चंद्रभान कदम ,माजी चेअरमन कारभारी पाटील मुंगसे , मा.चेअरमन बाबासाहेब मुंगसे ,विद्यमान चेअरमन संदेश मुंगसे,
पंचायत समितीचे सदस्य दादासाहेब एडके, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे, युवा नेते श्रीकांत हिवाळे, युवा नेते निलेश कोकरे, बलभीम सकट युवा नेते आकाश चेडे, घाडगे पाटील शाळेचे शिक्षक गणेश मुंगसे सर, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, एकनाथ फुलारी, बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे पाटिल, विश्वस्त सुभाष मुंगसे युवा नेते किशोर वांढेकर , माजी विद्यार्थी संघ 2003 गृप, बजरंग दल, कैलासनाथ मित्र मंडळ, दयासगर ग्रुप, व विविध शाखे ने व आदी मान्यवरांनी भरभरून शाळेचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.