*म.फु.कृ.विद्यापीठ राहुरी येथील अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे यांना भारत शिक्षणरत्न पुरस्कार प्रदान.*
*राहुरी* : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण, डॉ. एस. बी. खरबडे यांना *'भारत शिक्षण रत्न पुरस्कार'* देऊन गौरवण्यात आले आहे. *डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन टीचर्स वेल्फेअर असोसिएशन, बंगळूरू* यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षण, संशोधन आणि विस्तार या क्षेत्रांतील त्यांच्या २९ वर्षांच्या उल्लेखनीय योगदानाला आणि निस्सीम समर्पणाला आदराने गौरवण्यात आले.

डॉ. खरबडे यांनी कृषी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी, संशोधक आणि कृषी क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असून, या योगदानाचा हा गौरव आहे. या पुरस्कारामुळे विद्यापीठाची मान उंचावली असून, हे कृषी शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल आहे.
हा पुरस्कार त्यांच्या कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पण वृत्तीचा गौरव आहे. डॉ. खरबडे यांनी गेल्या २९ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात करून, त्यांनी नंदुरबार, कराड आणि कोल्हापूर येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणूनही यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. सध्या ते महात्मा फुले कृषी विद्यापीठात अधिष्ठाता पदावर कार्यरत आहेत.या सन्मानाबद्दल बोलताना डॉ. खरबडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे आणि विद्यापीठाच्या प्रशासनाचे आभार मानले. ते म्हणाले, हा पुरस्कार केवळ माझा नसून, माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान आहे.
हा पुरस्कार कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच म.फु .कृ.विद्यापीठ राहुरी चे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांच्या निधनानंतर डॉ.खरबडे यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचीही धुरा एक चांगले प्रशासक म्हणून सांभाळली.








