अग्निविर भरतीसाठी तरुणांचा मोठा सहभाग.मेजर जनरल अजय शेठी ...

1.

अहमदनगर म.फु.कृ.विद्यापीठ.ता. राहुरी येथे दि.२३ ऑगस्ट २०२२ पासून सूरू असलेल्या अग्नीवीर भरती मोहीमेत भरती होणाऱ्या तरुणांचा मोठ्या संखेने सहभाग असल्याचे मत भारतीय लष्कराचे भरती विभागाचे प्रमुख मेजर जनरल अजय शेठी यांनी व्यक्त केले या भरती मोहीमेअंतर्गत प्रथम सहभागी उमेदवाराची धावचाचणी घेतली जाते .

जे उमेदवार ह्या धावचाचणीत यशस्वी होतील याची पूढे फीजिकल फिटणेस टेस्ट होऊन पुढे बायोमेट्रीक चाचणी पूर्ण होऊन वजन.उंची.छाती.मोजुन सर्व कागदपत्र तपासणी केली जाते.

वैदयकीय चाचणी घेऊन निवड झालेले उमेदवार पूणे येथे पुन्हा वैदयकीय चाचणीसाठी पाठवले जातात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही निवड होत आहे अशी माहीती सैन्य भरती विभागाचे मेजर जनरल अजय शेठी यांनी पत्रकारांना दिली देशाच्या सेवेसाठी आनखी जास्तीत जास्त जवानांनी भाग घ्यावा तसेच ही अग्नीवीर भरती काटेकोर पणे असल्याने कोणतीही वशिलेबाजी येथे होत नाही भरतीसाठी आलेल्या तरुणांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता या मैदानात स्वबळावर उतरावे असे आव्हान ही श्री अजय शेठी यांनी केले.

प्रसार माध्यमांनी याचा ज्यास्तीत जास्त प्रसार करावा असेही अजय शेठी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले.