राहुरी तालुक्यातील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आक्रमक .प्रकृती चिंताजनक असल्याची सूत्रांकडून माहिती .

राहुरी तालुक्यातील पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पत्रकार संघटना आक्रमक .प्रकृती चिंताजनक असल्याची सूत्रांकडून माहिती .

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

       राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील सचिन पवार नामक पत्रकारावर जीव घेणा हल्ला डोक्यावर लागलेल्या मारामुळे प्रकृती चिंताजनक .

         अद्यापही आरोपी मोकाटच

     पत्रकार संरक्षण कायदया अंतर्गत पत्रकारांना न्याय देणार का ?

      पत्रकार संघटनांचा रोष अनावर पोलीस अधीक्षकांना प्रश्न ?

      याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की

     विद्युत रोहित्राशीअनधिकृत रित्या  छेडछाड करणाऱ्या प्राध्यापक उत्तम कदम व त्याचा पुतण्या आमोल मोहन कदम त्याचा लहान भाऊ नाव माहित नाही प्रश्न विचारला असता आक्रमक पवित्र घेत पत्रकारावर भ्याड हल्ला करण्याचा निंदनीय प्रकार डिग्रस येथे घडून आलेला आहे

        नित्यनेमाप्रमाणे कामकाजाच्या संदर्भात विद्यापीठ वरून घरी परतत असताना पत्रकार सचिन पवार हे गावा जवळ काले असता गावाजवळील डीपीवर कदम नामक प्राध्यापक व त्याचे बंधू छेडछाड करतानाचे दृश्य पाहून त्यांनी विचारणा केली विचारणा केली असता कुठलाही  आसपेस न धरता त्यांनी पत्रकारावर लाथा बुक्यांनी हल्ला केला या  अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते गोंधळून गेले व जखमी झाले . आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना तात्काळ राहुरी पोलीस स्टेशन येथे घेऊन जाण्यात आले फिर्याद दाखल केल्याच्या नंतर शासकीय रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली असता पवार यांना नगर येथे सिटीस्कॅन करता व पुढील उपचाराकरता पाठवण्यात आले आहे  .डोक्यात होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे पवार यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

          सदर घटनेचा अहमदनगर जिल्हा व राहुरी पत्रकार संघटनेच्या वतीने  निषेध व्यक्त करण्यात येत आहे

        संबंधित घटनेच्या निषेधार्थ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लवकरच निवेदन देऊन घडलेल्या प्रकाराबाबत पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.