राहुरी कृषी विद्यापीठातर्फे रब्बी पिकाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

राहुरी कृषी विद्यापीठातर्फे रब्बी पिकाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध

*राहुरी कृषि विद्यापीठातर्फे रब्बी पिकाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध* 

 

*राहुरी विद्यापीठ, दि. 22 सप्टेंबर, 2024* 

 

              महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी 2023- 24 हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्वारी, करडई, हरभरा व गहू पिकांचा मूलभूत व प्रमाणित/ सत्यप्रत बिज्योत्पादन कार्यक्रम राबविलेला आहे. रब्बी 2024 -25 हंगामासाठी वरील पिकांचे बियाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध संशोधन केंद्र, कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय व कृषि विज्ञान केंद्र या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या नजीकच्या कृषि विद्यापीठाच्या संशोधन केंद्रावर, कृषि महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय व कृषि विज्ञान केंद्र येथे बियाणेसाठी संपर्क साधावा. राहुरी येथील मध्यवर्ती बियाणे विक्री केंद्रावर व कृषि संशोधन केंद्र, चास, ता. जि. अहमदनगर येथे ज्वारीच्या फुले रेवती, फुले वसुधा, फुले सुचित्रा, फुले यशोमती, फुले मधुर, फुले रुचिरा, करडईच्या फुले भिवरा ( एसएसएफ- 13- 71) विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच हरभऱ्याचे विजय, फुले विश्वराज, दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत व गव्हाचे फुले समाधान या वाणांचे प्रमाणित /सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर- 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषि संशोधन केंद्र, सोलापूर येथे करडईच्या फुले भवरा (एसएसएफ- १३-७१) या वाणांचे प्रमाणित /सत्यप्रत बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कृषि संशोधन केंद्र, कुंदेवाडी, ता. निफाड या विक्री केंद्रावर हरभऱ्याच्या दिग्विजय, विशाल, फुले विक्रम, फुले विक्रांत व गव्हाच्या फुले समाधान या पिकांच्या वाणाचे प्रमाणित/ सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. कृषि तंत्र विद्यालय, मांजरी फार्म ता. हवेली, जि. पुणे या विक्री केंद्रावर गव्हाचे फुले समाधान या वाणांचे प्रमाणित/ सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, जि. सातारा व कृषि विज्ञान केंद्र, धुळे येथील विक्री केंद्रावर गव्हाचे फुले समाधान या वाणाचे प्रमाणित सत्यप्रत बियाणे ऑक्टोबर- 2024 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

            महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नितीन दानवले यांनी शेतकऱ्यांना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.